अजब मागणी करणाऱ्या तरुणीला अॅमेझॉनचं 'अमेझिंग' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 03:49 PM2018-04-23T15:49:28+5:302018-04-23T15:52:38+5:30
तरुणीची मागणी आणि अॅमेझॉनचं उत्तर ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही
मुंबई: आपलं दुकान, ज्यावर तुम्हाला मिळेल हवं ते सर्व सामान, अशी अॅमेझॉनची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. मात्र एका तरुणीला तिला हवी असलेली गोष्ट अॅमेझॉनवर सापडलीच नाही. त्या तरुणीनं याबद्दलची तक्रार अॅमेझॉनकडे केली. या तरुणीची मागणी अतिशय हटके होती आणि अॅमेझॉननं त्या तरुणीला तितकंच हटके उत्तर दिलं. सध्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर अगदी जोरात सुरू आहे.
अदिती नावाच्या एका तरुणीनं ट्विट करुन त्यामध्ये अॅमेझॉनला मेन्शन केलं. 'अॅमेझॉन स्वत:ला जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट म्हणवतं. मात्र माझी गरज पूर्ण करणारी गोष्ट इथे मिळतच नाहीय,' असं अदितीनं ट्विटमध्ये म्हटलं. यामुळे अॅमेझॉनची सोशल मीडिया टीमदेखील थोडी विचारात पडली. त्यांनी लगेच अदितीला रिप्लाय केला. 'आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आमच्या वेबसाईटवरील उत्पादनं वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला नेमकं काय हवंय, हे आम्हाला सांगाल का?,' असा रिप्लाय कंपनीच्या सोशल मीडिया टीमनं दिला.
Hi @amazonIN, you call yourself the biggest e-commerce website in the world, but even after browsing for hours, I can't find what I need.
— Aditii🎀 (@Sassy_Soul_) April 20, 2018
We're actively working towards understanding the needs of our customers and plan to expand our listings. Could you let us know the product that you're looking for on our website? ^KA
— Amazon Help (@AmazonHelp) April 20, 2018
अॅमेझॉनच्या ट्विटला अदितीनं दिलेलं उत्तर जरा हटके होतं. कंपनीनं अदितीला 'तुम्हाला नेमकं काय हवंय? तुम्ही आमच्या वेबसाईटवर काय शोधताय?,' असं विचारलं होतं. याला अदितीनं 'बस एक सनम चाहिए आशिकी के लिए,' असं उत्तर दिलं. अदितीच्या या भन्नाट ट्विटला अॅमेझॉननं तितकंच भन्नाट उत्तर दिलं. 'ये अख्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है. दिल क्या चीझ है जानम, अपनी जान तेरे नाम करता है,' असं उत्तर अॅमेझॉननं अदितीला दिलं. हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.
Bas ek sanam chahiye aashiqui ke liye..
— Aditii🎀 (@Sassy_Soul_) April 20, 2018
Yeh akkha India jaanta hai, hum tumpe marta hai,
— Amazon Help (@AmazonHelp) April 20, 2018
Dil kya cheez hai janam apni jaan tere naam karta hai 🎼😉 ^KA