लग्नासाठी टाळाटाळ करत होता पोलिसवाला, पोलिसांना घरी बोलवून तरूणी म्हणाली - त्याला सुट्टी द्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:34 PM2022-06-24T17:34:42+5:302022-06-24T17:34:59+5:30
Wedding News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता.
Wedding News: पोलिसवाले आपल्या नोकरीमध्ये इतके बिझी असतात की, त्यांना सहजपणे सुट्टी मिळत नाही. ज्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. अशीच घटना बाराबंकीमधून समोर आली. इथे एका पोलिसाची होणारी पत्नी लग्नाला उशीर होत असल्याने अशी काही रागावली की, तिने 112 वर फोन करून पोलिसांना बोलवलं. त्यानंतर हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसाला लग्नासाठी सुट्टी दिली.
बाराबंकी जिल्ह्यात तैनात शिपायाचं हे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरत आहे. या शिपायाची होणारी पत्नी लग्नाला खूप उशीर होत असल्याने इतकी नाराज झाली की, 112 नंबर डायल करून तिने पीआरवीला बोलवलं. ज्यानंतर बाराबंकी पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रकरण समजलं आणि आदेश दिले की, शिपायाला लग्नासाठी सुट्टी द्यावी.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता. लग्नाच्या तारखेबाबत बोलण्यासाठी तरूणी दुसऱ्या शहरातून त्याच्या घरी आली होती. पण यावेळीही त्याने सुट्टी मिळत नसल्याचं सांगत लग्न टाळण्याचा प्रयत्न केला.
पण यावेळी तरूणी वेगळ्याच मूडमध्ये होती. तिने रागाने 112 नंबर डायल केला आणि पोलिसांना घरी बोलवलं. त्यानंतर सगळं काही सांगितलं. हे प्रकरण तेव्हा बाराबंकी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना समजलं. त्यांनी शिपायाला सुट्टी देण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर लग्नाची सुट्टी घेऊन शिपाई तरूणीसोबत आपल्या घरी गेला.