तरूणीने गमतीत केली डीएनए टेस्ट, जे समोर आलं ते बघून बसला तिला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 01:24 PM2023-11-04T13:24:02+5:302023-11-04T13:24:21+5:30
तरूणीला समजलं की, ज्या व्यक्तीला ती तिचा पिता समजत होती, ती व्यक्ती तिचा जैविक पिता नाहीच.
डीएनए टेस्टच्या माध्यमातून आपल्या परिवाराबाबत जाणून घेण्याचा एक वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे. एका तरूणीने गमती-गमतीत घरीच डीएनए टेस्ट केली. त्यानंतर जे काही समोर आलं त्याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिच्या आई-वडिलांनी लपवलेलं एक रहस्य समोर आलं. तिला समजलं की, ज्या व्यक्तीला ती तिचा पिता समजत होती, ती व्यक्ती तिचा जैविक पिता नाहीच.
सोशल मीडिया साइट रेडिटवर महिलेने सांगितलं की, तिला आणि तिच्या बहिणींना आपल्या परिवाराबाबत जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. पण जे समोर आलं त्यानंतर त्या भावूक झाल्या. फॅमिली ट्री मध्ये बहिणी बहिणीच्या रूपात समोर आल्या, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळी होते. मी त्यांची सावत्र बहीण वाटत होते. सुरूवातीला वाटलं की, काहीतरी गडबड आहे. पण नंतर सत्य समोर आलं. तिने आई-वडिलांसोबत याबाबत बोलण्याचा विचार केला, पण यामुळे घरातील वातावरण खराब झालं असतं.
मिररच्या रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितलं की, मी याबाबत जास्त विचार केला नाही. पण माझ्या बहिणी याबाबत फार भावूक होत्या. त्यांना बोलायचं होतं, पण मला वाटत होतं की, यावरून आई-वडिलांचं भांडण व्हावं. पण एक दिवस मी आई-वडिलांना याबाबत विचारलं. तर ते नाराज झाले. आई रागात होती.
शेवटी वडिलांनी मान्य केलं
पण जास्त दिवस सत्य लपून राहू शकलं नाही. बहिणींना याबाबत सतत जाणून घ्यायचं होतं. त्या परिवारातील इतर सदस्यांसोबत चर्चा करत होत्या आणि मग एक दिवस सगळ्यांना याबाबत समजलं. माझ्या वडिलांना मान्य केलं की, मी त्यांची मुलगी नाहीये. पण ते असं म्हणाले की, आम्ही भलेही तुला जन्म दिला नाही, पण तू नेहमी माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती. माझ्या इतर मुलींसारखीच तू सुद्धा आहे.