प्यारवाली लव्हस्टोरी! वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात वेडी झाली 'ती'; वयात 25 वर्षांचं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:32 PM2022-12-09T17:32:10+5:302022-12-09T17:37:28+5:30
एक तरुणी चक्क तिच्या वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलं आहे.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एक तरुणी चक्क तिच्या वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलं आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये ही विचित्र घटना घडली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती बसने दररोज प्रवास करत होती आणि तिला बसमधील ड्रायव्हरने वाजवलेली गाणी खूप आवडायची. हळूहळू गाण्यांसोबतच ती बस ड्रायव्हरच्याही प्रेमात पडली.
बस ड्रायव्हर आणि मुलीच्या वयात मोठं अंतर होतं. पण या फरकाकडे दुर्लक्ष करून दोघांनीही लग्न केलं आहे. पाकिस्तानी यूट्यूबर सय्यद बासित अलीने या जोडप्याची मुलाखत घेतली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या मुलाखतीत मुलीचे वय बस ड्रायव्हरच्या वयाच्या निम्म्याहून कमी असल्याचं समोर आलं आहे. मात्र आता या दोघांची अनोखी प्रेमकहाणी चर्चेचा विषय बनली आहे. 50 वर्षीय सादिक हा बस ड्रायव्हर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मिया चन्नू ते लाहोरपर्यंत बस चालवतो. 24 वर्षीय तरुणी देखील या बसमधून दररोज प्रवास करत होती. ती शेवटच्या स्टॉपवर उतरायची. म्हणजेच ती बसमध्ये बराच वेळ थांबायची आणि याच दरम्यान बस ड्रायव्हर सादिक आणि तरुणी एकमेकांच्या जवळ आले. मुलीने तिच्या अनोख्या प्रेमकथेबद्दल सांगितले की, तिला बस ड्रायव्हर सादिकची प्रत्येक सवय आवडते. गाडी चालवताना तो प्रवासात बसमध्ये जुनी गाणी वाजवत असे आणि ही गाणी त्याला खूप आवडतात.
गाण्यांवर नाचत ती रोज घरी यायची. याचदरम्यान ती सादिकच्या प्रेमात कधी पडली, हे तिलाच कळले नाही. हळूहळू ती बस ड्रायव्हर सादिकशी विविध कारणाने बोलू लागली. मात्र, एके दिवशी तिने हिंमत करून सादिकसमोर आपले प्रेम व्यक्त केले. हे पाहून सादिकला खूप आनंद झाला आणि त्याने तिचा प्रस्ताव स्वीकारला. तरुणी आणि सादिकच्या वयात 25 वर्षांचा फरक आहे, प्रेमात एकमेकांचे वय पाहिले जात नाही, असं तरुणीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.