बाबो! 'ती' वाईट सवय पडली महागात, 30 वर्षांची तरुणी दिसू लागली म्हातारी; अशी झाली भयंकर अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:34 PM2022-06-16T13:34:10+5:302022-06-16T13:35:17+5:30

एका महिलेला तिची एक वाईट सवय चांगलीच महागात पडली आहे. 30 वर्षांची तरुणी यामुळे आता थेट 80 वर्षांची म्हातारी दिसू लागली आहे.

girl got this bad addiction 80 years old woman started appearing at the age of 30 | बाबो! 'ती' वाईट सवय पडली महागात, 30 वर्षांची तरुणी दिसू लागली म्हातारी; अशी झाली भयंकर अवस्था

फोटो - झी न्यूज

Next

काही वाईट सवयी या शरीरासाठी हानिकारक असतात. अनेकदा नशेचं व्यसन देखील माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. तसेच नशेमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका महिलेला तिची एक वाईट सवय चांगलीच महागात पडली आहे. 30 वर्षांची तरुणी यामुळे आता थेट 80 वर्षांची म्हातारी दिसू लागली आहे. तिच्या एका वाईट सवयीमुळे तिची इतकी भयंकर अवस्था झाली ज्यामुळे तरुणपणातच ती म्हातारी झाली.

न्यूयॉर्क पोस्टमधील रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या टेनेसीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीचं नाव एशले बटलर आहे. जिचं वय फक्त 30 वर्षे आहे. तिला ड्रग्जचं व्यसन आहे. या व्यसनामुळे तिचे सर्व दात पडले आहेत. एशले सांगते की, ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. ज्यानंतर डिप्रेशनमुळे तिला ड्रग्जचं व्यसन जडलं. त्याचा परिणाम थेट तिच्या दातांवर झाला. तिच्या दातांवरील इन्फेक्शन वाढलं आणि ते खराब होऊ लागले. दात पडल्याने तिचा चेहरा वृद्ध महिलेसारखा दिसू लागला.

एशलेने दिलेल्या माहितीनुसार, आता ती नकली दात लावते आणि मेकअप करते, ज्यामुळे ती तिच्या वयाला साजेशी तरुण दिसू लागते. आपल्या या दोन्ही लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा लूक पाहून नेटिझन्स तिला कॅटफिश म्हणू लागले. पण तिने याला विरोध केला आहे. तिला कॅटफिश म्हटलेलं अजिबात आवडत नाही. याआधी देखील ड्रग्जमुळे लोकांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: girl got this bad addiction 80 years old woman started appearing at the age of 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.