हौसेला मोल नाही! मॉडेलिंग सोडून ट्रक ड्रायव्हर बनली तरुणी; आधी होती ब्युटी क्वीन, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:28 AM2023-05-22T10:28:26+5:302023-05-22T10:29:43+5:30
मॉडेलिंगचं करिअर सोडून तरुणीने ट्रक ड्रायव्हर होण्यास प्राधान्य दिलं.
अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेली 23 वर्षीय तरुणी आता ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. मॉडेलिंगचं करिअर सोडून तिने ट्रक ड्रायव्हर होण्यास प्राधान्य दिलं. तरुणी म्हणते की, तिला HGV (जड वाहनं, जसं की ट्रक, लॉरी) चालवण्याची आवड आहे. सडपातळ दिसणारी ही मुलगी 44 टन वजनाची लॉरी सहज चालवू शकते. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
द सनच्या वृत्तानुसार या मुलीचे नाव मिली एवरेट आहे. ती लिंकनशायर, यूके येथील रहिवासी आहे. काही स्थानिक सौंदर्य स्पर्धा जिंकण्याव्यतिरिक्त, मिस इंग्लंड 2018 ची फायनलिस्ट देखील आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. असं असतानाही मॉडेलिंगसारखे ग्लॅमरस करिअर निवडण्याऐवजी तिने लॉरी चालक होण्याला प्राधान्य दिलं.
यामागचे कारण स्पष्ट करताना मिली सांगते की, फक्त पुरुषच मोठी वाहने (HGV) चालवू शकतात असा सर्वसाधारण समज आहे. मला तो समज तोडायचा आहे. हे काम स्त्रियाही उत्तम प्रकारे करू शकतात हे लोकांना कळायला हवे. सध्या, UK मध्ये फक्त 2% महिला HGV वाहनं चालवतात.
ट्रक, लॉरी चालवण्यास सुरुवात
गेल्या वर्षी मिलीने हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. सध्या ती अवजड वाहन (HGV लायसन्स) चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणादरम्यानच तिने ट्रक, लॉरी वगैरे चालवण्यास सुरुवात केली आहे. तिला आशा आहे की लवकरच ती ते रस्त्यावरही उत्तम चालवू शकेल.
सामान्य कुटुंबातून आलेल्या मिलीने मॉडेलिंग केले आहे. पण तिला शेतीची कामे आणि वाहन चालवण्यात जास्त आवड आहे. मिली सांगते की, कोरोना संकटाच्या काळात लॉरी किंवा ट्रक चालवण्याची प्रेरणा तिला मिळाली. कारण त्यावेळी ब्रिटनमध्ये ट्रक डायव्हर्सची कमतरता होती.
कुटुंबाला आहे अभिमान
मिली सांगते की, माझ्या कामावर पालक खूप खूश आहेत. ते एक शेतकरी आहेत आणि त्याला माझा अभिमान आहे. मिलीच्या मते - मी एक 'रियल गर्ल' आहे. कोणी म्हणत नाही. मात्र, तरीही काही लोक ट्रोल करतात. ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय माझ्यासाठी नाही, असे सांगितले जाते. पण मी त्यांना महत्त्व देत नाही, दुर्लक्ष करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.