कुत्र्यांसारखी चालू आणि भुंकू लागली मुलगी, नंतर समोर आला आई-वडिलांचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:47 AM2024-02-20T10:47:45+5:302024-02-20T10:48:04+5:30
ऑक्सानाचे आई-वडील दारोडे होते. घरात अनेक कुत्रे पाळले होते. तीन वर्षाची असतानापासून ऑक्साना या कुत्र्यांसोबत राहत होती.
ही कहाणी त्या मुलीची आहे जिला तिच्या आई-वडिलांनी आपल्या स्थितीवर सोडलं. तिने प्राण्यांसोबत मैत्री केली. मैत्री इतकी घट्ट होती की, ती त्यांच्यासारखीच वागू लागली. तिचं नाव ऑक्साना मलाया. ती अनेक वर्ष कुत्र्यांसोबत राहत होती.
नंतर एक दिवस यूक्रेनच्या अधिकाऱ्यांची तिच्यावर नजर पडली. ती जेवणही या जीवनांसारखीच करत होती. सोबतच त्यांच्यासारखी भुंकतही होती. ऑक्सानाचे आई-वडील दारोडे होते. घरात अनेक कुत्रे पाळले होते. तीन वर्षाची असतानापासून ऑक्साना या कुत्र्यांसोबत राहत होती.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कुत्र्यांसोबत ऑक्सानाची भेट एका हिवाळ्यातील रात्री झाली. ती तिच्या घरातील डॉग हाऊसमध्ये गेली होती. आता ऑक्सानाचं वय 42 आहे. ती आता मनुष्यांसारखं बोलायला शिकली आहे.
ती म्हणाली की, 'आईला खूपसारी मुले होती. आमच्याकडे पुरेसे बेडही नव्हते'. कुत्र्यांसोबत वाढल्याने ऑक्साना त्यांच्यासारखीच दोन हात आणि दोन पायांवर चालत होती. जमिनीवरचं जेवण चाटून खाऊ लागली होती. तिने असाही दावा केला की, ती कुत्र्यांसोबत बोलू शकते. ती म्हणाली की, मी त्यांच्यासोबत बोलू शकते.
1991 मध्ये ऑक्सानाला केअर होममध्ये नेण्यात आलं होतं. ती सहा वर्ष कुत्र्यांसोबत राहिली. नंतर हळूहळू तिने मुनष्यांसारखं बोलणं आणि वागणं शिकलं. तिला बोलणं शिकण्यासाठी अनेक थेरपी करण्यात आल्या. पण ती आजही अनेकदा कुत्र्यांसारखं वागते.
ती म्हणाली की, जेव्हाही मला एकटं वाटतं तेव्हा चारही पायांवर चालू लागते. कारण माझं कुणीच नाही. मी माझा वेळ कुत्र्यांसोबत घालवते. मी फिरायला जाते आणि जे मला वाटतं ते करते. कुणीही लक्ष दिलं नाही की, मी चार पायांवर चालते.
यूक्रेनच्या मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्साना शेतांमध्ये काम करते. ऑक्साना अशी पहिली व्यक्ती नाही जी प्राण्यांसोबत इतकी वर्ष राहिली. इंग्लंडमधील मरीना चॅपमॅनही कथितपणे अपहरणानंतर जवळपास पाच वर्ष जंगलात माकडांसोबत राहिली होती.