बॉयफ्रेंडने केली अशी चूक, गर्लफ्रेंडने तीन दिवस रूममध्ये केलं लॉक; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:17 AM2023-05-20T11:17:37+5:302023-05-20T11:18:07+5:30

इथे एक तरूणी तिच्या  बॉयफ्रेंडवर नाराज झाली आणि तिने त्याला तिच्या घरी बोलवलं. त्यानंतर तिने जे केलं ते वाचून सगळेच हैराण आहेत. 

Girl locks her boyfriend for three days without food water know the reason | बॉयफ्रेंडने केली अशी चूक, गर्लफ्रेंडने तीन दिवस रूममध्ये केलं लॉक; जाणून घ्या कारण...

बॉयफ्रेंडने केली अशी चूक, गर्लफ्रेंडने तीन दिवस रूममध्ये केलं लॉक; जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Girl Locks Boyfriend: तशा तर कपल आणि रिलेशनशिपबाबत अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण अनेकदा जेव्हा दोघांमध्ये भांडणं होतात तेव्हा त्यांच्यातील वाद ताणला जातो. अशात हैराण करणाऱ्या गोष्टी ते करतात. अशीच एक हैराण करणारी घटना अर्जेंटीनामधून समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या  बॉयफ्रेंडवर नाराज झाली आणि तिने त्याला तिच्या घरी बोलवलं. त्यानंतर तिने जे केलं ते वाचून सगळेच हैराण आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेतील तरूण एका तरूणीसोबत बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होता. अशात त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला एका दुसऱ्या तरूणीसोबत बोलताना बघितलं. तरूणाला ही चूक महागात पडली. दोघांमध्ये यावरून वाद झाला. त्यानंतर तरूणीने त्याच्या मोबाइलमधील सगळे सोशल मीडिया अॅप्स अनइंस्टॉल केले. नंतर त्याला घरात नेलं.

तरूणीने त्याला एका रूममध्ये बंद केलं आणि बाहेरून लॉक लावलं. त्याला 3 दिवस घरात कोंडून ठेवलं होतं. अशात तरूणाने कसातरी आपला जीव वाचवण्यासाठी तरूणीचा मोबाइल चोरी केला आणि आपल्या मित्राला मेसेज करून पोलिसांना याची सूचना दिली. पोलीस लगेच तरूणीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तरूणाला वाचवलं. सध्या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणाने सांगितलं की, आधीही तरूणी त्याच्यासोबत खूप भांडत होतं आणि त्याच्यावर खूप संशय घेत होती. मित्रांसोबत बाहेर गेल्यावर त्याच्याशी भांडत होती. एका रिपोर्टनुसार, दोघेही एकमेकांना 6 महिन्यांपासून डेट करत होते. पोलिसांनी तरूणीला अटक केली आहे. तसेच पुढील चौकशी सुरू आहे. दोघांच्या मित्रांचीही विचारपूस केली जात आहे. 

Web Title: Girl locks her boyfriend for three days without food water know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.