आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:07 AM2023-05-26T09:07:22+5:302023-05-26T09:07:50+5:30
तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला.
Bhagalpur Girlfriend Boyfriend viral video: बिहार (Bihar)च्या भागलपूरमध्ये एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची कॉलर पकडून त्याला मंदिरात खेचत नेलं आणि लग्नाचा हट्ट करू लागली. दोघांमध्ये यावरून बराच वेळ वाद सुरू होता. हातात हार घेऊन तरूणी लग्नासाठी दबाव टाकत राहिली. कुणीतरी या हाय व्होल्टेज ड्रॉम्याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. भतोरिया गावातील करिश्मा आणि त्याच गावातील रोहित नावाच्या तरूणाचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण जेव्हा तरूणी प्रेग्नेंट झाली तेव्हा प्रियकर लग्नास टाळाटाळ करू लागला.
तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. पण त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर लग्नाबाबत बोलताच तरूण तिच्यापासून दूर गेला.
त्यानंतर तरूणीने महिला पोलीस स्टेशनमध्ये प्रियकराविरोधात रेपचा गुन्हा दाखल केला. तेच तरूणाने कोर्टातून जामीन मिळवला आणि आता पुन्हा एकदा प्रेयसी लग्नासाठी त्याच्यामागे लागली आहे. यासाठी शहरातील खलीफाबग चौकात ती पोहोचली जिथे तिचा प्रियकर होता. प्रियकरा पाहून तिने गोंधळ घातला आणि ते बघून लोकांची गर्दी जमा झाली. त्याला खूप ऐकवल्यानंतर तिने त्याची कॉलर पकडली आणि त्याला मंदिरात घेऊन गेली.
मंदिरातही दोघांमध्ये बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच होता. करिश्मा म्हणाली की, जर रोहितने तिच्यासोबत लग्न केलं नाही तर ती विष पिऊन जीव देईल. पण धक्कादायक बाब म्हणजे तरूणीचं आधीच लग्न झालं आहे. या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. दोघांच्याही परिवाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आहे.