कांदा, टॉमेटोची साल फेकुन देताय? या मुलीकडे द्या, करेल असे काही की तुम्ही अवाक् व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:18 PM2021-07-27T18:18:13+5:302021-07-27T18:46:06+5:30
काही मुलांचे पाय पाळण्यातच दिसतात. ही मुलं लहान वयातच अशी काही कर्तबगारी करतात की त्यांच्यापुढे मोठ्यांच कर्तुत्वही फिकं पडतं. एका १० वर्षाच्या मुलीने हे सिद्ध करून दाखवलंय. इतक्या लहानवयातच तिनं जगानं दखल घ्यावी अशी कामगिरी केलीय...
काही मुलांचे पाय पाळण्यातच दिसतात. ही मुलं लहान वयातच अशी काही कर्तबगारी करतात की त्यांच्यापुढे मोठ्यांच कर्तुत्वही फिकं पडतं. एका १० वर्षाच्या मुलीने हे सिद्ध करून दाखवलंय. इतक्या लहानवयातच तिनं जगानं दखल घ्यावी अशी कामगिरी केलीय.
या मुलीचं नाव मान्या हर्ष. ती ६वीच्या वर्गात शिकते. आजीकडे निसर्गसंपन्न वातावरणात वाढलेल्या मान्याला निसर्गाविषयी खुप प्रेम आहे. या प्रेमापोटीच तिनं कांदा, टॉमेटो आणि लसणाच्या सालीपासून पेपर तयार केला आहे. केवळ १० कांद्याच्या सालींपासून मान्याने ए-४ साईजचा पेपर बनवला आहे. मान्याच्या या कामाचं जगभरातून कौतुक होतंय. संयुक्त राष्ट्र जल यांनी तिच्या या कामाचा विशेष उल्लेख करत तिचं कौतुक केलंय.
मान्या नेहमी रस्त्यावरील कचऱ्याकडे पाहुन अस्वस्थ व्हायची. तिला पर्यावरण कचरामुक्त असावे असे वाटायचे. तसेच तिला झाडांविषयीही प्रेम होते. त्यामुळे झाडे वाचवण्यासाठीही काहीतरी करायचा तिचा विचार होता. याच विचारातून तिने कचऱ्यातून पेपर बनविण्याचा प्रयोग यशस्वी केला.
मान्याच्या या प्रयत्नामुळे कचऱ्याचे व्यवस्थापनही होऊ शकते व कागद निर्मितीसाठी केली जाणारी वृक्षाची तोड थांबवता येऊ शकते. तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या २०२० सालच्या पर्यावरण जागृतीसाठी घेण्यात आलेल्या अॅनिमेटेड स्पर्धेत भाग घेतला होता.ती पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एक ब्लॉगही लिहिते.