या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये आहे 4 चुका, नजर तीक्ष्ण असेल तरच शोधू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:01 AM2023-04-18T10:01:33+5:302023-04-18T10:04:48+5:30
Brightside ने भ्रम निर्माण करणारा असाच एक फोटो शेअर केला आहे. यातून तुमची हुशारी आणि तुमची नजर चेक करता येते. सोफ्यावर बसून पुस्तक वाचत असलेल्या मुलीच्या या फोटोमध्ये काही चुका आहेत.
भ्रम निर्माण करणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुम्ही पाहिले असतील. असे फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंजही देतात. अशा फोटोंमधील रहस्य शोधण्यात मजाही येते आणि मेंदुला चालनाही मिळते. हे फोटो कन्फ्यूज करणारे असतात. कारण यांमध्ये जे दिसतं ते नसतं. काही फोटो असे असतात ज्यात एखादी चूक असते आणि ती चूक लोकांना शोधायची असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Brightside ने भ्रम निर्माण करणारा असाच एक फोटो शेअर केला आहे. यातून तुमची हुशारी आणि तुमची नजर चेक करता येते. सोफ्यावर बसून पुस्तक वाचत असलेल्या मुलीच्या या फोटोमध्ये काही चुका आहेत. पण त्या लगेच दिसत नाहीत. या चुका शोधण्यासाठी तुमच्या 21 सेकंदाचा वेळ आहे.
‘ब्राइट साइट’ने चॅलेंज म्हणून हा फोटो शेअर केला आहे. यात एक मुलगी रूममधील सोफ्यावर बसून पुस्तक वाचत आहे. तिने हिरव्या रंगाचं स्वेटर आणि पायांमध्ये ब्राउन कलरचे शूज घातले आहेत. भींतीवर एक घड्याळ आहे. तर बाजूला कॅलेंडर लटकलेलं आहे. ज्यावर जून महिना दिसत आहे. आता तुम्हाला यात 3 ते 4 चुका शोधायच्या आहेत.
पहिल्यांदा पाहिला तर फोटो एकदम सामान्य वाटतो. यात काही चूक असेल असं काही वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही फोटोतील गोष्टी बारकाईने बघता तेव्हा तुम्हाला एक एक चूक दिसू लागते. पहिली चूक म्हणजे भींतीवरील घड्याळात आहे. त्यात आकड्यांचा पूर्ण क्रमच चुकीचा आहे. त्यानंतर कॅलेंडरवर जून महिना दिसत आहे. त्यावर 31 दिवस दिले आहेत, वास्तविक पाहता जूनमध्ये 30 च दिवस असतात. आता तिसरी चूक म्हणजे मुलीच्या शूजकडे बघा. दोन्ही पायात वेगवेगळ्या साइजचे शूज घातले आहेत. आणखी एक चूक म्हणजे कॅलेंडरवर जून महिना आहे. म्हणजे उन्हाळा आहे आणि मुलीने स्वेटर घातलं आहे.