बाबो! आधी हौसेने टॅटू काढला अन् नंतर पाहून ढसाढसा रडायला लागली; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:52 PM2022-03-02T12:52:30+5:302022-03-02T12:53:36+5:30
एका तरुणीनेही आनंदात आपल्या छातीवर एक टॅटू काढला पण टॅटू पाहताच तिच्यावर रडण्याची वेळ आली.
सध्या टॅटूची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगातील अनेक लोक खूप विचार करून टॅटू काढण्याचा निर्णय घेतात. पर्मनंट टॅटू ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर एखाद्यासोबत राहते. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती त्याच्या स्पेलिंगपासून त्याच्या डिझाईनबद्दल खूप सावध असते. पण हा टॅटू चुकीचा निघाला तर किंवा काढताना मोठी चूक झाली तर? सोशल मीडियावर एका मुलीने तिच्यासोबत घडलेली अशीच एक घटना शेअर केली आहे. मुलीने मोठ्या उत्साहात छातीवर टॅटू काढला होता. तो एक प्रेरणादाय़ी टॅटू होता. पण त्यात एक चूक झाली.
एका तरुणीनेही आनंदात आपल्या छातीवर एक टॅटू काढला पण टॅटू पाहताच तिच्यावर रडण्याची वेळ आली. ही तरुणी हा टॅटू आपल्या शरीरावरून कायमचा काढून टाकण्यासाठी धडपडत आहे. 18 वर्षांची जेनिफर मॅकगीने आपल्या छातीवर टॅटू काढला. पण टॅटू काढल्यानंतर तिला टॅटूमध्ये असं काही दिसलं की तिला पश्चाताप होतो आहे. जेनिफरच्या या टॅटूमध्ये एक चूक झाली आहे. ज्यामुळे तिला आता लाज वाटते आहे. तिला लवकरात लवकर हा टॅटू घालवायचा आहे. पण तिने परमनंट टॅटू काढून घेतला आहे, ज्यामुळे तो काढून टाकणं कठीण आहे.
जेनिफरने आपल्या छातीवर दोन फुलपाखरांचे टॅटू काढण्याचं ठरवलं. त्यामध्ये तिने with pain comes strength अशी एक प्रेरणादायी ओळ लिहिली. हे कर्सिव्ह रायटिंगमध्ये होतं, त्यामुळे जेव्हा हा टॅटू काढला तेव्हा तो ठिक वाटला. पण जेव्हा तो टॅटू त्वचेवर पक्का झाला तेव्हा त्यात सर्वात मोठी चूक तिला दिसली. टॅटू आर्टिस्टने strength ची स्पेलिंग strenth लिहिली होती. त्यामुळे टॅटू पाहताच ती ढसाढसा रडू लागली.
जेनिफरच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काहींनी तिला टॅटू काढताना नीट लक्ष द्यायला हवं होतं, तिच्या हलगर्जीपणामुळेच हा चुकीचा टॅटू झाला आहे असं म्हटलं आहे. जेनिफर आता पुढे काय करणार अशी विचारणा देखील काही युजर्सनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिने हा टॅटू हटवणार असल्याचं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.