ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी दुकानात गेली महिला, काही मिनिटात झाली कोट्यावधी रूपयांची मालक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:47 PM2024-11-12T13:47:28+5:302024-11-12T13:48:02+5:30

ती एका दुकानात केवळ ऑरेंज ज्यूस खरेदी करण्यासाठी गेली होती. इथेच तिने एक गमतीने एक लॉटरी तिकीट खरेदी केलं आणि तिचं नशीब चमकलं. 

Girl stopped to drink orange juice become millionaire in few minutes | ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी दुकानात गेली महिला, काही मिनिटात झाली कोट्यावधी रूपयांची मालक!

ऑरेंज ज्यूस घेण्यासाठी दुकानात गेली महिला, काही मिनिटात झाली कोट्यावधी रूपयांची मालक!

North Carolina Viral News : ते म्हणतात ना, कुणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल काहीच सांगता येत नाही...! असंच काहीसं नॉर्थ कॅरोलीनातीला महिला केली स्पाहरसोबत झालं. ती एका दुकानात केवळ ऑरेंज ज्यूस खरेदी करण्यासाठी गेली होती. इथेच तिने एक गमतीने एक लॉटरी तिकीट खरेदी केलं आणि तिचं नशीब चमकलं. 

स्पाहरने सांगितलं की, "मी पाहिलं की, तिथे काही नवीन लॉटरी तिकीट ठेवलेले आहेत. मी विचार केला की, एकदा नशीब आजमवायला काय करत आहे". महिलेने 20 डॉलर म्हणजे साधारण 17 हजार रूपयांमध्ये मेरी मल्टिप्लायर स्क्रॅच-ऑफ तिकीट निवडलं. ही तिकीट तिच्यासाठी लकी ठरलं. महिलेला या तिकिटातून 2.5 लाख डॉलर म्हणजे साधारण 2,10,98,007 रूपये मिळाले.

केली म्हणाली की, "आमच्यासाठी ही रक्कम जीवन बदलून टाकणारी आहे. याने आम्हाला भरपूर मदत मिळेल". ती असंही म्हणाली की, ही रक्कम केवळ तिच्या परिवारासाठी नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या रकमेतून त्यांचं जीवन आणखी चांगलं होईल आणि अनेक आर्थिक समस्या दूर होतील.

आणखी एकाचं असंच चमकलं नशीब

केलीसोबतच आणखी एका लॉटरी विजेत्याची कहाणी सध्या चर्चेत आहे. एक व्यक्ती कामावर जात असताना जेवणाचा डबा घरीच विसरला. त्याला पत्नीचा फोन आला की, तुम्ही डबा घरीच विसरले आहात. पत्नीच्या सांगण्यावरून तो रस्त्यातील एका स्टोरमध्ये थांबला. जेणेकरून तिथे त्याला काही खायला घेता येईल. पण त्याला हे नव्हतं माहीत की, या स्टोरमध्ये थांबल्यावर तो २ मिलियन डॉलर म्हणजे सादारण २४.२४ कोटी रूपयांचा मालक होणार आहे. 

Web Title: Girl stopped to drink orange juice become millionaire in few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.