iPhone चोरायला आला पण ती 'असं' काही बोलली की चोर थेट पळूनच गेला; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:46 PM2022-12-12T14:46:35+5:302022-12-12T14:52:42+5:30
खोटी कथा सांगून एका चोराला आयफोन चोरण्यापासून थांबवलं.
एका मुलीने खोटं बोलून आपला आयफोन चोरी होण्यापासून वाचवल्याची हटके घटना आता समोर आली आहे. मुलीने कशी अनोखी शक्कल लढवली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीने सांगितलं की, ती एका बॉक्समध्ये फोन घेऊन घरी परतत होती. तेव्हा एका व्यक्तीची नजर बॉक्सवर पडली. पण चोराने आयफोन हिसकावताच या तरुणीने त्या बॉक्समध्ये तिच्या आईच्या अस्थी असल्याचं खोटं सांगितलं. हे ऐकून चोर तिथून थेट पळून गेला.
टिकटॉकवरील ही अमेरिकन तरुणी मॅडी बी वेब नावाने प्रसिद्ध आहे. तिचे तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मॅडीने अलिकडेच तिच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की तिने खोटी कथा सांगून एका चोराला आयफोन चोरण्यापासून थांबवलं. मॅडीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं - मी खरंच खोटं बोलून स्वतःला लुटण्यापासून वाचवलं. बॉक्समध्ये आयफोन होता.
मॅडीने दिलेल्या माहितीनुसार, तिने नवीन फोन ऑर्डर केला होता. ती तो घेण्यासाठी घराबाहेर गेली. त्यानंतर एक संशयित तिच्याभोवती घिरट्या घालू लागला. तो एका झटक्यात फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बाजूला येऊन तिला विचारलं, की बॉक्समध्ये काय आहे. मात्र मॅडीने बॉक्समध्ये तिच्या आईच्या अस्थी असल्याचं सांगताच चोर पळून गेला.
प्रत्यक्षात मॅडीची आई जिवंत आणि बरी आहे. चोरी टाळण्यासाठी मॅडी खोटं बोलली. याबद्दल तिनं खंतही व्यक्त केली आहे. आता मॅडीची ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये ती तिची गोष्ट भावूकपणे सांगत आहे. टिकटॉकवर तिचा व्हिडीओ 2.3 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर हजारो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"