कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:17 PM2022-12-20T16:17:07+5:302022-12-20T16:19:57+5:30
Bihar : इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती.
Bihar : बिहारच्या बेतियामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या कोचिंग टीचरसोबत पळून गेली आणि दोघांनी लग्न केलं. तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणासोबतच 5 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तरूणीने तिचा एक व्हिडीओ जारी करत अपहरण झाल्याचं नाकारलं. व्हिडीओत तरूणी म्हणाली की, तिने स्वत: टीचरला पळवून नेऊन लग्न केलं. तिने ही खोटी केस मागे घेण्याची मागणी केली आहे. असं झालं नाही तर ती याबाबत सुप्रीम कोर्टात जाणार असा इशारा तिने दिला आहे.
इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती.
यादरम्यान ती तिचा कोचिंग टीचर चंदनच्या जवळ आली. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. अंजलीने व्हिडीओ व्हायरल करत पूर्ण कहाणी सांगितली. गेल्या 12 डिसेंबरला अंजली घरातून पळून जाऊन बेतियाला आली. प्रियकर ती तिच्या घरातील लोकांवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण जेव्हा घरातील लोक तयार झाले नाही तेव्हा तिने चंदन पळवून नेलं आणि त्याच्यासोबत लग्न केलं.
या मुलीने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपल्या परिवाराला इशारा दिला आहे की, तिचा पती आणि सासरच्या लोकांविरोधात खोट्या केस दाखल करू नये. नाही तर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टात घेऊन जाणार. माझा हट्टी स्वभाव तुम्हा लोकांना चांगलाच माहीत आहे.
अंजलीने व्हिडीओत तिचं वय 21 असल्याचं सांगितलं. तसेच तिने बेतिया जिल्हाधिकारी, एसपी आणि पोलिसांकडे स्वत:च्या, पतीच्या आणि सासरच्या लोकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तरूणीने तिच्या घरातील लोकांवर आरोप लावला आहे की, हे लोक माझ्या पतीला जीवे मारू शकतात आणि ते अॅसिडने हल्ला करू शकतात.