Video : बेशुद्ध न करता केली तरूणीची ब्रेन सर्जरी, लोकांनी फेसबुकवर पाहिली लाइव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 04:05 PM2019-10-31T16:05:16+5:302019-10-31T16:08:37+5:30

आपल्याला हे चांगलंच माहीत आहे की, कोणतंही मोठं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा त्या व्यक्तीला बेशुद्ध केलं जातं. पण असं बेशुद्ध न करता कुणाची ब्रेन सर्जरी केल्याचं तुम्ही ऐकलंय का?

Girl undergoes brain surgery on facebook live first time in history | Video : बेशुद्ध न करता केली तरूणीची ब्रेन सर्जरी, लोकांनी फेसबुकवर पाहिली लाइव्ह!

Video : बेशुद्ध न करता केली तरूणीची ब्रेन सर्जरी, लोकांनी फेसबुकवर पाहिली लाइव्ह!

Next

आपल्याला हे चांगलंच माहीत आहे की, कोणतंही मोठं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा त्या व्यक्तीला बेशुद्ध केलं जातं. पण असं बेशुद्ध न करता कुणाची ब्रेन सर्जरी केल्याचं तुम्ही ऐकलंय का? इतकेच नाही तर ही ब्रेन सर्जरी फेसबुक लाइव्ह केल्याचं ऐकलंय? नक्कीच नसेल ऐकलं. पण टेक्नॉलॉजिमुळे सगळंच शक्य होत आहे. अमेरिकेतील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा कारनामा करून दाखवला आहे. हे लाइव्ह फेसबुकवर २३०० लोकांनी पाहिलं सुद्धा.

मेथोडिस्ट डलास मेडिकल सेंटरमध्ये Jenne Schardt या तरूणीची ब्रेन सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी फेसबुक लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली. यावेळी रूग्ण डॉक्टरसोबत बोलताना दिसत आहे. डॉ. निमेश पटेल जे मेथोडिस्ट डलासचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या फेसबुक पेजवर सकाळी ११.४५ वाजता ब्रेन सर्जरीची प्रक्रिया लाइव्ह करण्यात आली.

असं का केलं?

Tangled Blood Vessels ला ब्रेनमधून काढून टाकण्यासाठी ही सर्जरी करण्यात आली. यादरम्यान रूग्णासोबत सतत बोलत राहणं गरजेचं असतं. जेणेकरून काही चूक झाली तर ती सुधारता यावी. Jenne सोबतही डॉक्टर सर्जरी दरम्यान बोलत होते. ते सतत तिला काही फोटो दाखवत होते, जेणेकरून हे जाणून घेता यावं की, सर्जरीत मेंदूच्या व्यवस्थित भागासोबत काही छेडछाट केली जात नाहीये ना.

Dr. Bartley Mitchell यांनी सांगितले की, 'जर या सर्जरीदरम्यान काही चुकीचं झालं असतं तर ती आयुष्यात कधीच बोलू शकली नसती. त्यामुळे आम्ही तिच्याशी बोलत होतो. जेणेकरून आम्हाला हे कळावं की, सर्जरी योग्य दिशेने सुरू आहे'.

डॉ. निमेश पटेल यांनी पुढे सांगितले की, या सर्जरी दरम्यान जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम सुद्धा अ‍ॅक्टिवेट केली होती. या जीपीएस द्वारे मेंदूच्या त्या भागांबाबत सांगितलं जातं, ज्यांना डॉक्टरांना काहीच करायचं नसतं. Jenne ची प्रकृती आता ठीक आहे. तिने सांगितले की, तिची ही सर्जरी पाहून इतर लोकांनाही मदत मिळेल. 


Web Title: Girl undergoes brain surgery on facebook live first time in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.