Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:21 PM2021-12-29T14:21:26+5:302021-12-29T14:22:07+5:30

जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

girl walking without mask viral video reporter asked why you are not wearing mask she replied i had breakup | Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

Next

Viral Video : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Corona Omicron Variant) प्रसार झपाट्यानं होताना दिसत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये कठोक निर्बंध लादण्यात येत आहेत. शिवाय लोकांना कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही केलं जात आहे. परंतु तरीही काही लोक असे आहेत जे नियमांची पर्वा करत नाहीत आणि मास्कशिवाय फिरतानाही दिसतात. त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरंही खूप मजेशीर असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत असलेला हा व्हिडीओ पटना येथील 'सभ्यता द्वार'चा आहे. येथे एक मुलगी तिच्या कुटुंबासोबत फिरताना दिसत आहे. मुलीने मास्क घातलेला नाही. अशा स्थितीत एक रिपोर्टर त्याला थांबवतो. आधी रिपोर्टर विचारतो, 'सभ्यतेच्या द्वार आल्यावर कसं वाटतंय'. मुलगी उत्तर देते की 'खुप छान' वाटतंय. यानंतर रिपोर्टर पुन्हा त्या त्या मुलीला 'इथे चेकिंग नव्हते का' असा प्रश्न विचारतो. यावर उत्तर देताना 'हो, गेटवरचा गार्ड मास्ककडे पाहत होता', असं म्हणताना ती मुलगी दिसत आहे. परंतु त्यावेळी मास्क लावला होता आता आत आल्यानंतर काढल्याचंही ती पुन्हा विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देताना म्हणते.


दिलं भन्नाट उत्तर
बाहेस असताना मास्क लावलं होतं, परंतु आत आल्यावर असं काय झालं जे मास्क काढलं, असा प्रश्न रिपोर्टरनं तरुणीला विचारला. यावर तिनं दिलेलं उत्तर पोट धरुन हसायला लावणारं आहे. आत आल्यावर मास्कसोबत ब्रेक अप झालं असं उत्तर ती देताना दिसते. सध्या हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून मोठ्या प्रमाणात व्हायरलही होताना दिसत आहे.

Web Title: girl walking without mask viral video reporter asked why you are not wearing mask she replied i had breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.