बापरे! डोकेदुखीला हलक्यात घेणं पडू शकतं महागात; तरुणीला आला भयंकर अनुभव, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:50 PM2022-03-25T12:50:52+5:302022-03-25T12:52:06+5:30

कधी कधी ही डोकेदुखी महागात पडू शकते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका तरुणीला भयंकर अनुभव आला आहे.

girl was suffering from headache since childhood investigation revealed she was suffering from tangerine sized brain tumor | बापरे! डोकेदुखीला हलक्यात घेणं पडू शकतं महागात; तरुणीला आला भयंकर अनुभव, झालं असं काही...

बापरे! डोकेदुखीला हलक्यात घेणं पडू शकतं महागात; तरुणीला आला भयंकर अनुभव, झालं असं काही...

Next

धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा कामाचा ताण आणि इतर गोष्टींमुळे डोकं दुखतं. प्रत्येकाला कधी ना कधी डोकेदुखीची समस्या उद्भवते. पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लहान मुलांनाही अशी समस्या असू शकते. पण कधी कधी ही डोकेदुखी महागात पडू शकते. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका तरुणीला भयंकर अनुभव आला आहे. ग्लासगो येथे राहणाऱ्या नियामला लहानपणापासून डोकेदुखीची समस्या होती. तिच्या डोक्यात असह्य वेदना व्हायच्या. 

डोकेदुखीमुळे तिला शाळेत जाणं, अभ्यास करणं, खेळणंही शक्य होतं नव्हतं. या डोक्यातील वेदनांनी तिचं बालपण हिरावून घेतलं. बऱ्याच डॉक्टरांकडे ती गेली. तिला काही चाचण्या करायला सांगण्यात आल्या. पण तिने किंवा तिच्या पालकांनी त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण आता वयाच्या 14 व्या वर्षी तिची समस्या अधिक वाढली. एक दिवस सकाळी तिला डोळ्यांनी दिसणंही बंद झालं. तिचा चेहरा एका बाजूला झुकला होता. तिची अवस्था इतकी भयंकर झाली की तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

नियामच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यातून जे समोर आलं ते पाहून तिच्या पालकांना मोठा धक्काच बसला. तसेच तिच्याही पायाखालची जमीन सरकली. सीटी स्कॅन आणि एमआरआय करण्यात आलं. तेव्हा ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं. तिला गँग्लियोग्लियोमा (ganglioglioma) होतं. संत्र्याच्या आकाराचा ट्युमर तिच्या मेंदूत होता. ट्युमरचा परिणाम म्हणून तिच्या चेहरा लकवा मारल्यासारखा झाला होतो. नियामला जन्मापासूनच हा ब्रेन ट्युमर असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

नियामवर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून तिची सर्जरी करण्यात आली आणि अखेर ती बरी झाली. तिच्या चेहऱ्यावरील लकव्याची स्थिती हळूहळू सुधारते आहे. ती आता 23 वर्षांची झाली आहे. आता ती ब्रेन ट्युमर चॅरिटीचा भाग आहे. आपल्यासारख्या इतर लोकांची मदत आणि त्यांची देखभाल करते, त्यांना सल्ला देते. जेणेकरून त्यांना ब्रेन ट्युमरवर मात करायला आणि मानसिक समस्यांचा सामना करायला मदत मिळते. ते जनजागृतीचं काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: girl was suffering from headache since childhood investigation revealed she was suffering from tangerine sized brain tumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.