बाबो! बॉयफ्रेंडसोबत डेटवर टाईट जीन्स घालून गेली, नंतर पोहोचली थेट आयसीयुमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:48 IST2021-10-05T18:45:38+5:302021-10-05T18:48:14+5:30
एका तरुणीला डेटवर जाताना टाईट जिन्स घालणं चांगलंच महागात पडलं. सॅमनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट जिन्स घातली. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला इतक्या जखमा झाल्या की तिला थेट आयसीयु मध्ये दाखल व्हाव लागलं.

बाबो! बॉयफ्रेंडसोबत डेटवर टाईट जीन्स घालून गेली, नंतर पोहोचली थेट आयसीयुमध्ये...
डेटवर जाताना आपण आकर्षक दिसावं म्हणून मुली अनेक फॅशनेबल गोष्टी ट्राय करतात. त्यातच सध्या टाईट जिन्सचा ट्रेण्ड सध्या इन आहे. मात्र, सॅम नावाच्या एका तरुणीला डेटवर जाताना टाईट जिन्स घालणं चांगलंच महागात पडलं. सॅमनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट जिन्स घातली. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला इतक्या जखमा झाल्या की तिला थेट आयसीयु मध्ये दाखल व्हाव लागलं.
सॅमनं आपल्यासोबत झालेली ही घटना टिकटॉकवर (TikTok) शेअर केली आहे. सॅम आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती. यादरम्यान तिनं अत्यंत टाईट पॅन्ट घातली होती. आठ तास तिनं ही जिन्स घातली. यानंतर जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या कमरेच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. सुरुवातीला तिला अँटीबायोटिक दिल्या गेल्या. डॉक्टरांना वाटलं, की तिला फक्त स्किन इनफेक्शन झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचंच औषध दिलं. मात्र, सॅमची अवस्था सुधारली नाही.. दुसऱ्याच दिवशी तिला चालण्यासही अडचण येऊ लागली.
सॅम जेव्हा दुसऱ्या डॉक्टरकडे गेली तेव्ही डॉक्टरांनी तिच्या पायाची अवस्था पाहताच तिला आयसीयूमध्ये भर्ती केलं. डॉक्टरांनी सांगितलं, की तिला सेप्सिस आणि सेलुलिटिस झालं होतं. इन्फेक्शन थांबवण्यासाठी तिला लगेचच आयसीयूमध्ये भर्ती केलं गेलं. मात्र, सुदैवानं तिची सजर्री करावी लागली नाही. आता सॅम बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.