अंडरगारमेंट्ससहीत सगळेच इतरांनी वापरलेले कपडे घालते ही तरूणी, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 05:06 PM2022-01-13T17:06:12+5:302022-01-13T17:06:52+5:30

तुम्ही विचार कराल की, तिच्याकडे नवे कपडे घ्यायला पैसे नसतील. त्यामुळे ही तरूणी इतरांनी वापरलेले कपडे घालत असेल. पण असं अजिबात नाहीये.

Girl wears second hand undergarments to the clothes this is the reason | अंडरगारमेंट्ससहीत सगळेच इतरांनी वापरलेले कपडे घालते ही तरूणी, कारण वाचून व्हाल अवाक्

अंडरगारमेंट्ससहीत सगळेच इतरांनी वापरलेले कपडे घालते ही तरूणी, कारण वाचून व्हाल अवाक्

Next

तशी तर महिलांना कोणत्याही निमित्ताने शॉपिंग करण्याची आवड असते. त्यांना नेहमीच नवे कपडे घालून वेगळं दिसायचं असतं. त्यांच्या हाती जसे पैसे येतात तशा त्या कपडे आणि शूजची शॉपिंग करतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत जी अंडरविअरपासून ते ब्रापर्यंत सगळं काही इतरांनी वापरलेले कपडे घालते. 

तुम्ही विचार कराल की, तिच्याकडे नवे कपडे घ्यायला पैसे नसतील. त्यामुळे ही तरूणी इतरांनी वापरलेले कपडे घालत असेल. पण असं अजिबात नाहीये. ही तरूणी मार्केटिंग इंडस्ट्रीत नोकरी करते आणि तिच्याकडे अजिबात पैशांची कमी नाही. ही तरूणी इतरांनी वापरलेले कपडे एका खास उद्देशाने वापरते.

अंडरगारमेंट्सही नवे घेत नाही

ब्रिटनची राहणारी २४ वर्षीय बेकी ह्यूफ्सने गेल्या २ वर्षांपासून स्वत:साठी नवीन कपडे खरेदी केलेले नाहीत. नव्या कपड्यांऐवजी बेकी सेकंड हॅंड कपडे खरेदी करते. असं करून बेकी लाखो रूपयांची बचत करते. याच कारणाने ती तिच्यासाठी नवीन कपडे खरेदी करत नाही. इतकंच काय तर ती तिच्यासाठी अंडरगारमेंट्सही नवे खरेदी करत नाही. तेही ती सेकंड हॅंड खरेदी करते.

'द मिरर' च्या वृत्तानुसार, बेकीने तीन वर्षाआधी शपथ घेतली होती की, ती नव्या कपड्यांऐवजी सेकंड हॅंड कपडे खरेदी करेल. ही तिची पैसे बचत करण्याची अनोखी पद्धत आहे. बेकी म्हणाली की, नवीन असो वा सेकंड हॅंड दोन्ही दिसायला सारखेच असतात. तेच दोन्हींच्या किंमतीत बराच फरक असतो. त्यामुळे नव्या कपड्यांवर खर्च करणे फालतू आहे.

बेकी ब्रिटनच्या वॉल्वरहॅम्पटनमध्ये राहते. २०१८ मध्ये तिने नवीन कपडे सोडून सेकंड हॅंड कपडे खरेदी करणं सुरू केलं आहे. बेकी चॅरिटी शॉप किंवा अॅप्सच्या माध्यमातून सेकंड हॅंड कपडे खरेदी करते. बेकी सांगते की, तिच्या कलेक्शनमध्ये डिझायनर्सचे कपडे आहेत. ती सांगते की, नवे कपडे खरेदी करण्यासाठी तिला ४० ते ५० हजार रूपये खर्च करावे लागतात. तेच तिला ४०० ते ५०० रूपयात मिळतात. 

बेकीने तिचे अंडरगारमेंट्सही चॅरिटी शॉप्समधून खरेदी केले आहेत. ती सांगते की, तिच्याकडे ब्रा चं कलेक्शन आहे. चॅरिटी शॉप्समधून कपडे खरेदी करून ती वर्षाला २ ते अडीच लाख रूपये वाचवते. इतकंच नाही तर बेकी तिने वापरलेले कपडे विकते सुद्धा. अशात तिला जुन्या कपड्यांच्या बदल्यात पैसेही मिळतात.

Web Title: Girl wears second hand undergarments to the clothes this is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.