बॉयफ्रेंडला नको होतं बाळ, आई बनण्यासाठी गर्लफ्रेंडने घेतली दुसऱ्याची मदत आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 01:34 PM2023-03-15T13:34:39+5:302023-03-15T13:34:58+5:30
तिने याबाबत कीथसोबत चर्चा केली की, तिला आई व्हायचं आहे. पण कीथला बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि पुढेही बाळाचा त्याचा काही प्लान नव्हता.
कोणत्याही पती-पत्नीसाठी आई-वडील होणं यासारखं दुसरं सुख नसतं. पण यासोबत जीवनात अनेक जबाबदाऱ्याही येतात. ज्या पार पाडणं फार अवघड असतं. याच कारणाने अनेक लोक बाळांना जन्मच देत नाहीत. त्यांना आर्थिक रूपाने सक्षम व्हायचं असतं. पती-पत्नीसाठी बाळाचं प्लानिंग करणं सामान्य आहे, पण जेव्हा हा विषय बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडबाबत येतो तेव्हा फार अवघड होतं.
या गोष्टीची चिंता 36 वर्षीय कीथ हेमीला वाटली जेव्हा त्याची 35 वर्षीय गर्लफ्रेंड रॅशेल मेकगिनीजला आई बनण्याची ईच्छा झाली. द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, आयरलॅंडच्या डबलिन (Dublin, Ireland) ची राहणारी रॅशेल एका चाइल्ड केअर वर्कर आहे. ती आणि कीथ 8 वर्षांपर्यंत मित्र होते, नंतर ते प्रेमात पडले. रॅशेलचं वय वाढत होतं आणि तिला माहीत होतं की, काही काळाने तिचं फर्टाइलचं वयही निघून जाईल. तेव्हा तिला बाळाला जन्म देण्यात समस्या येईल.
त्यामुळे तिने याबाबत कीथसोबत चर्चा केली की, तिला आई व्हायचं आहे. पण कीथला बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि पुढेही बाळाचा त्याचा काही प्लान नव्हता. तेव्हा रॅशेलने ठरवलं की, ती एकटी बाळाला जन्म देईल. तेव्हा तिने अनोळखी स्पर्म डोनरकडून स्पर्म घेऊन आयव्हीएफ केलं. ज्यासाठी तिला 8 लाख रूपये खर्च आला. कीथलाही रॅशेलच्या या निर्णयाबाबत काही समस्या नव्हती.
डबलिनमध्ये आयव्हीएफ प्रोसीजरची मोठी रांग होती. त्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये ती आपल्या 72 वर्षीय आईसोबत ग्रीसमधील क्लीनिक सेरम आयव्हीएफमध्ये पोहोचली. तिथे खर्चही कमी होता आणि परिवारातील मिळत्या जुळत्या स्पर्म डोनरची माहिती काढली आणि प्रक्रिया सुरू केली.
घरी आल्यावर दहा दिवसांनी तिला समजलं की, ती प्रेग्नेंट आहे. गेल्यावर्षी तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. ज्यांना आता कीथही खूप प्रेम करतो. आता कीथ आणि रॅशेल मिळून बाळांची काळजी घेतात. पण बाळांच्या बर्थ कागदपत्रांवर वडिलांचं नाव नाहीये. ती कीथवर बाळांना अडॉप्ट करण्याचा किंवा कोणताही दबाव टाकत नाही.