एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी संपूर्ण शहरात महिलेने केला अजब कारनामा, गाववाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:25 AM2019-08-30T11:25:16+5:302019-08-30T11:29:59+5:30

एक महिला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी अजब कारनामे करत आहेत. ज्यामुळे अख्ख्या शहरातील लोक हैराण झाले आहेत.

Girlfriend begging to her boyfriend for meeting in Australia | एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी संपूर्ण शहरात महिलेने केला अजब कारनामा, गाववाले हैराण!

एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी संपूर्ण शहरात महिलेने केला अजब कारनामा, गाववाले हैराण!

Next

लोक प्रेमात काहीही करतात हे आपण नेहमीच बघत असतो. याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. ही घटना आहे ऑस्ट्रेलियातील. इथे एक महिला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी अजब कारनामे करत आहेत. ज्यामुळे अख्ख्या शहरातील लोक हैराण झाले आहेत. या तरूणीने एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी शहरातील सर्वच भींतींवर मेसेज लिहीले आहेत. आणि त्याला भेटण्याची विनंती करत आहे.

या महिलेने ऑस्ट्रेलियाच्या फ्रेंकटाउनमधील पार्क, पब्लिक वॉशरूम, बायबेक्यू आणि जवळपास सर्वच भींतींवर मेसेज लिहिला आहे की, 'बाळ या जगात येण्याआधी तुझं माझ्याशी बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर चिंता करण्याची गरज नाही'. या महिलेने लिहिलेले हे मेसेज लोकांनी सोशल मीडियात शेअर केले आहेत. तसेच असेही लिहिले की, क्रिस तुझी एक्स शहरातील सर्वच भींतीची ही स्थिती करण्याआधी तिच्याशी एकदा बोल.

महिलेच्या या मेसेजेसनंतरही क्रिसने तिला अजूनही संपर्क केलेल नाही. पण महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ३६ वर्षीय महिलेवर मुद्दाम सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करण्याचा आरोप आहे. सद्या ती जामिनावर बाहेर आहे. 

क्रिसने त्याच्या एक्ससोबत बोलावं या उद्देशाने स्थानिकांनी महिलेच्या मेसेजचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. मेसेज शेअर करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, एक्स बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी महिलेची ही आयडिया त्याला फारच गंमतीदार वाटली. 

आता लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे की, हा क्रिस अखेर आहे तरी कोण आणि का तो इतक्या मेसेजेसनंतरही एक्स गर्लफ्रेन्डला भेटत नाहीये. असं वाटतंय की, क्रिसने या महिलेसोबत ब्रेकअप केलं होतं. आता ही महिला क्रिसच्या बाळाची आई होणार आहे. त्यामुळे चिंतेत ती हे करत आहे. 

Web Title: Girlfriend begging to her boyfriend for meeting in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.