Girlfriend-Boyfriend On Rent! प्रतितास भाड्याने घ्या जोडीदार; होतो कायदेशीर करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 10:35 AM2023-05-27T10:35:34+5:302023-05-27T10:36:18+5:30
तुम्ही एखाद्या अॅपद्वारे काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता.
पैशाने सर्वकाही खरेदी करता येऊ शकते असं गेल्या काही वर्षात बऱ्याचदा ऐकायला मिळाले आहे. पण प्रेम पैशाने विकत घेता येत नाही, ते अनमोल आहे असं म्हटलं जाते. पण आज याला खोटं पाडण्यासाठी काही देश प्रेमाची किंमत ठरवायला लागले आहेत. मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या या बिझनेसला ग्राहकांचीही रांग लागली आहे. लोक हवी ती किंमत मोजायलाही तयार आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया.
Girlfriend-Boyfriend On Rent याचा अर्थ काही तासासाठी इमोशनल आणि इंटीमेसीचा अनुभव घेण्यासाठी मुले किंवा मुली भाड्याने घेतले जाऊ शकतात. आता तुम्हाला कुणाला इन्प्रेस करण्यासाठी रोमॅन्टिक बाता करण्याची गरज नाही. कुणाला समजवण्यासाठी त्याच्या मागे लागण्यासाठी आवश्यकता नाही. पण एक अट आहे की तुमच्याकडे पैसे असायला हवेत. कारण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड तुम्हाला प्रतितास दराने भाड्याने घेण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर डेटिंगची पारंपारिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही.
मात्र ही सर्व्हिस अद्याप सर्व देशांमध्ये सुरू झाली नाही. केवळ चीन आणि जपान या देशातील लोक याचा पुरेपूर उपयोग करत आहेत. एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, जपानी अॅपवर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भाड्याने घेण्यासाठी किंमत प्रति तास $30 ते $150 पर्यंत आहे, जी भारतीय चलनात २,४८१ ते १२,४०८ रुपये आहे. याशिवाय, भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रवासासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
जपानमध्ये, तुम्ही एखाद्या अॅपद्वारे काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. यामध्ये व्यक्ती आपल्या भाड्याने घेतलेल्या जोडीदाराशी थेट संपर्क साधू शकत नाही. ही एडल्ट ओरिएंटेड सर्व्हिस नाही ज्यात बार होस्टेसपासून टॉपलेस डान्सर आणि मालिश करणाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. इतकेच नाही तर भाड्याने घेतलेल्या जोडीदाराचे चुंबनही घेऊ शकत नाही. याशिवाय महागड्या भेटवस्तू देण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर मुलींच्या सुरक्षेसाठी ही सेवा फक्त सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
कोण घेतात 'ही' सेवा?
ही सेवा घेणारे बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी कधीही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवलेला नाही किंवा कोणाशी डेटवरही गेलेले नाहीत. २० वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना जपानमध्ये ही सेवा घेणे आवडते.
भारतातही या ट्रेंडची मागणी
भारतातही या व्यवसायाची मागणी वाढत आहे. गुरुग्रामच्या शकुल गुप्ता यांनी 'बॉयफ्रेंड ऑन रेंट' बोर्ड घेऊन स्वत:ची जाहिरात केली. त्याला ५० हजारांहून अधिकांनी लाईक आणि कमेंट करून त्यात रस दाखवला. अनेकांनी त्याला त्याच्यासोबतच्या करारासाठी विचारणाही केली. मात्र, यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही शकुलने स्पष्ट केले.