मृत्यू होणार हे माहीत होतं तरी प्रेयसीने केलं लग्न, लग्नानंतर काही दिवसातच प्रियकराचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:16 PM2023-01-06T13:16:09+5:302023-01-06T13:19:12+5:30

Love Story : 2017 मध्ये ब्रेन्डेनला Dilated Cardiomyopathy नावाचा आजार झाला. हा हृदयाच्या मांसपेशींचा एक गंभीर आजार आहे. यामुळे ब्रेन्डेनला सतत हॉस्पिटलला दाखल करावं लागत होतं.

Girlfriend married to dying lover in ICU this love story will make you Emotional | मृत्यू होणार हे माहीत होतं तरी प्रेयसीने केलं लग्न, लग्नानंतर काही दिवसातच प्रियकराचं निधन

मृत्यू होणार हे माहीत होतं तरी प्रेयसीने केलं लग्न, लग्नानंतर काही दिवसातच प्रियकराचं निधन

Next

Love Story : एका महिलेने हॉस्पिटलमध्ये तिच्या बालपणीच्या प्रियकरासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. तो एका गंभीर आजाराशी लढत होता. हे माहीत असूनही महिलेने त्याच्यासोबत लग्न केलं. कारण त्यांनी बालपणीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या या कपलची ही अनोखी कहाणी चर्चेत आहे. 

News.com.au नुसार, 35 वर्षीय पेजेन अरमानास्को आणि 36 वर्षीय ब्रेन्डेन बालपणापासून मित्र होते. पुढे जाऊन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुलंही आहेत. लग्न मार्च 2023 मध्ये होणार होतं. पण यादरम्यान ब्रेन्डेनची तब्येत बिघडली. 

2017 मध्ये ब्रेन्डेनला Dilated Cardiomyopathy नावाचा आजार झाला. हा हृदयाच्या मांसपेशींचा एक गंभीर आजार आहे. यामुळे ब्रेन्डेनला सतत हॉस्पिटलला दाखल करावं लागत होतं. मात्र, ब्रेन्डेन आणि त्याच्या प्रेयसीला विश्वास होता की, एकना एक दिवस तो या आजाराला मात देईल. त्यामुळे त्यांनी जल्लोषात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पण नियतीला वेगळंच मंजूर होतं. डॉक्टरांनी सांगितलं की, ब्रेन्डेन फार दिवस जगू शकणार नाही. त्याच्या आयुष्यातील काहीच दिवस शिल्लक आहेत. हे ऐकून पेजेनला चांगलाच धक्का बसला. तरीही तिने ब्रेन्डेनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नाची तारीख मार्च 2023 होती. पण ब्रेन्डेनची तब्येत दिवसेंदिवस बिघडत असल्यने पेजेनने हॉस्पिटलमध्येच त्याच्यासोबत लग्न करण्याचं ठरवलं. मेडिकल स्टाफची परवानगी मिळाल्यानंतर कपलने जवळच्या लोकांसमोर लग्न केलं. लग्नाचे जे फोटो समोर आले त्यात ब्रेन्डेन आयसीयूमधील बेडवर लेटलेला आहे. पेजेन नवरीच्या गेटअपमध्ये आहे.

पेजेन म्हणाली की, आम्हाला माहीत होतं की, कोणत्याही वेळी ब्रेन्डेनचा मृत्यू होऊ शकतो. पण आशा नव्हती की, हे इतक्या लवकर होईल. ब्रेन्डेनला गेल्यावर्षी हृदय विकाराचा झटका आल्याने आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. तिथे त्याला आणखी पाच झटके आलले. ज्यानंतर त्याचं निधन झालं.

पेजेनने सांगितलं की, डॉक्टरांचा फोन आला की, ब्रेन्डेनची स्थिती फार नाजूक झाली आहे. त्याच्याकडे काही तासच उरले आहेत. हे ऐकातच डोळ्यात पाणी आलं. ती हॉस्पिटलमध्ये निघाली. तिने कसंतरी मेकअप केलं. वेडिंग गाउन घातला आणि नवरी ब्रेन्डेन समोर आली.

इथे मेडिकल स्टाफ आणि आपल्या तीन मुलांसोबत तिने ब्रेन्डेनसोबत आयसीयूमध्ये लग्न केलं. या दरम्यान सगळेच भावूक झाले होते. त्यांनी त्यांच्या या अनोख्या लग्नाचं फेसबुक लाइव्ह केलं. लग्नानंतर काही दिवसांनीच ब्रेन्डेनचं निधन झालं. 

पेजेन म्हणाली की, ब्रेन्डेन एक प्रेम करणारा आणि इमानदार साथीदार होता. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना नेहमीच हसवत होता. मला माहीत आहे की, तो आम्हाला बघत होता. लव्ह यू ब्रेन्डेन.

Web Title: Girlfriend married to dying lover in ICU this love story will make you Emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.