काय सांगता! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बल २५ हजार किलोमीटरचा प्रवास, अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 02:40 PM2022-09-21T14:40:17+5:302022-09-21T14:46:21+5:30

बॉयफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी गर्लफ्रेंडने चक्क २५ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही घटना ७० वर्षापूर्वीची ब्रिटनमधील आहे.

girlfriend travels 25 thousand kilometers to meet boyfriend love story | काय सांगता! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बल २५ हजार किलोमीटरचा प्रवास, अन्...

काय सांगता! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बल २५ हजार किलोमीटरचा प्रवास, अन्...

googlenewsNext

रिलेशनशीप म्हटलं की भांडण, रुसवे, फुगवे आलेच. पण कधी कधी एखाद्या रिलेशनशीपमध्ये एवढी मोठी भांडण होतात की पुन्हा ते मिटत नाहीत.यात काहीजण ब्रेकअप करतात तर काहीजण भांडण मिटवतात. अशीच एक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी गर्लफ्रेंडने चक्क २५ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. 

ही घटना ७० वर्षापूर्वीची ब्रिटनमधील आहे. मुलीचे नाव उरसुला कार्नी असं आहे. तर तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जॉन असं आहे. उरसुलाचे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जॉन ब्रिटन सोडून ऑस्ट्रेलियाला गेला. त्यामुळे या दोघांचे कायमचे ब्रेकअप झाले. त्यामुळे उरसुलाही खूपच नाराज झाली. 

हार्ट अटॅकने आयुष्यच बदललं; 53 वर्षीय व्यक्ती दिसू लागला 25 वर्षांचा तरुण, जाणून घ्या, नेमकं कसं?

यानंतर तिने उरसुलाने २५ हजार किलोमीटरचा प्रवास करत थेट ऑस्ट्रेलिया गाठले. त्यामुळे हे कपल पुन्हा एकत्र आले. १९७० मध्ये उरसुला मॅनचेस्टर, साउथेम्पटन (ब्रिटेन) मध्ये राहत होती. ती नॉर्थ आणि साऊथ आफ्रिकावरुन थेट ऑस्ट्रेलिया येथील जॉनच्या घरी पोहोचली. यावेळी जॉन उरसुलाला पाहून आनंदीत झाला. 

जॉनचे वय सध्या ७८ आहे. मी ज्यावेळी माझी शिफ्ट संपवून घरी गेलो तेव्हा माझ्या घरी उरसुला माझी वाट पाहत होती. मला वाटत नव्हते उरसुला माझ्या आयुष्यात पुन्हा येईल. पण मी तिला पाहून खूप आनंदीत झालो होते, असं जॉन म्हणाला. 

उरसुलाचे वय आता ७४ वर्षे आहे. या दोघांची लव्हस्टोरी याअगोदर पहिल्यांदा १९७२ मध्ये वर्तमानपत्रात छापून आली होती. आता लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. 

रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले अन् पार्सलच्या बॅगमध्ये अचानक ४३ हजार सापडले, मग..

जॉन आणि उरसुला मॅनचेस्टरचे राहणारे आहेत. ५० वर्षापूर्वी एका कार बनवणाऱ्या कंपनीत दोघांची ओळख झाली. यानंतर दोघांच एकमेकांवर प्रेम झाले. यानंतर दोघांचे काही कारणाने भांडण झाले. यानंतर जॉन ऑस्ट्रेलियाला आले. त्यानंतर जॉन यांनी उरसुला यांना पत्र लिहिले. हे पत्र मिळाल्यानंतर उरसुलाने २५ हजार किलोमीटरचा प्रवास करत थेट ऑस्ट्रेलिया गाठले.यानंतर या दोघांनी लग्न केले. जॉन आणि उरसुला यांना दोन मुल आहेत. सध्या ते कॅनडामध्ये राहत आहेत. 

Web Title: girlfriend travels 25 thousand kilometers to meet boyfriend love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.