गर्लफ्रेंड हॉस्पिटलच्या बेडवर होती अन् बॉयफ्रेंडनं असा 'कारनामा' ज्यानं सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:08 PM2022-04-01T19:08:36+5:302022-04-01T19:08:49+5:30

रुग्णालयात वेळ जात नाही, खूप एकटं वाटत असते अशा परिस्थितीतून गेल्यावर युवकाने असे काही केले की, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Girlfriend was in hospital bed, boyfriend was playing game for timepass | गर्लफ्रेंड हॉस्पिटलच्या बेडवर होती अन् बॉयफ्रेंडनं असा 'कारनामा' ज्यानं सगळेच हैराण

गर्लफ्रेंड हॉस्पिटलच्या बेडवर होती अन् बॉयफ्रेंडनं असा 'कारनामा' ज्यानं सगळेच हैराण

Next

वॉशिंग्टन : एखाद्या रूग्णासाठी रूग्णालयात राहणे उपचारासाठी गरजेचे असले तरी त्यांच्या नातेवाईकांना तेथे वेळ घालवणे कठीण होऊन बसते. घरातला किंवा नातेवाईक रुग्णालयात दाखल असतो तेव्हा त्याच्या सोयीसाठी एखाद्याला कायम रुग्णालयात राहावं लागते. मग त्याठिकाणी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न तयार होतो. अमेरिकेत राहणाऱ्या एका युवकानं या परिस्थितीचा सामना केला अन् त्याच्या डोक्यात भलतीच भन्नाट कल्पना आली.

रुग्णालयात वेळ जात नाही, खूप एकटं वाटत असते अशा परिस्थितीतून गेल्यावर युवकाने असे काही केले की, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या युवकाने संपूर्ण गेमिंग सिस्टम उचलून रुग्णालयात नेले. जोपर्यंत त्याची गर्लफ्रेंड  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली तोपर्यंत त्याने गेम खेळून स्वत:चे मनोरंजन केले. त्या युवकाच्या गर्भवती गर्लफ्रेंडला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्या युवकाला तिथे वेळ घालवणे कठीण होत होते. म्हणून तो त्याच्या संपूर्ण गेमिंग सिस्टमसह  Xbox, मॉनिटर आणि हेडसेट घेऊन हॉस्पिटलच्या खोलीत गेला. त्या युवकाची मैत्रीण अंबरनेही TikTok वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो व्हिडिओ गेम खेळताना दिसत आहे.

काहींनी त्या युवकावर राग काढला

अंबरने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला १.६ मिलियन व्ह्यूज मिळाले. त्याच वेळी, ४५००० लाईक्स आणि ३२०० हून अधिक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत. गर्लफ्रेंडने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या बॉयफ्रेंडने संपूर्ण गेमिंग सिस्टम हॉस्पिटलमध्ये आणले, जेणेकरून त्याचा वेळ निघून जाईल.' मात्र, युवकाने केलेल्या कृत्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. काही लोक म्हणतात की, यावरून तो आपल्या गरोदर गर्लफ्रेंडची काळजी घेण्याबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. एका यूजरने 'मलाही गेम्स आवडतात, पण मी असे कधीच करणार नाही' अशी कमेंट केली आहे.

क्रीडा प्रेमी युवकाच्या समर्थनार्थही काही कमेंट्सही आल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'त्याने हॉस्पिटलमध्ये बसून त्याच्या मैत्रिणीकडे बघावे असे तुम्हाला काय वाटते? मला खात्री आहे की त्याच्या मैत्रिणीलाही त्याला व्हिडिओ गेम खेळताना पाहून आनंद होईल. त्याच्या जागी मी असते तर तेच केले असते. त्याचबरोबर अंबरनेही तिच्या बॉयफ्रेंडच्या समर्थनार्थ पुढे लिहिलं आहे. बॉयफ्रेंडच्या हॉस्पिटलमध्ये गेम खेळण्यात त्याला कोणतीही अडचण नसल्याचे ती सांगते. तो माझी पूर्ण काळजी घेत होता. 'हॉस्पिटलमध्ये टाईमपास करणं अवघड आहे आणि यासाठी मी चित्रपट पाहते किंवा सोशल मीडिया अकाउंटही तपासते असंही गर्लफ्रेंड म्हणाली.

Web Title: Girlfriend was in hospital bed, boyfriend was playing game for timepass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.