भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:59 AM2023-02-02T09:59:27+5:302023-02-02T10:00:09+5:30

Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

Girls get pregnant before wedding weird tradition around world | भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

Next

Weird Tradition Around The World: बऱ्याचदा लोक हा विचार करतात की, आदिवासी समाजातील लोकांच्या परंपरा मॉडर्न जगापासून फार वेगळ्या असतात. जास्तीत जास्त लोकांनी ज्या प्रथा आजच्या जगात मागे सोडल्या आहेत, त्या या लोकांनी आजही धरून ठेवल्या आहेत. पण आज आम्ही हा विचार चुकीचा ठरवणाऱ्या एका समाजाबाबत सांगणार आहोत. येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

लिव इन रिलेशनशिपबाबत आजही समाजात वाद होतात. पण गरसिया समाजात ही परंपरा 1 हजार वर्षापासून चालत आली आहे. इथे तरूण आणि तरूणी सोबत राहून आधी बाळाला जन्म देतात, नंतर लग्नाबाबत विचार करतात. हा समाज काही आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात राहत नाही. हे लोक आपल्याच देशात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात. 

या समाजातील मुलींना त्यांच्यासाठी मुलगा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. यासाठी दोन दिवसांची जत्रा भरवली जाते. इथे त्या त्यांच्या आवडीचा मुलगा निवडून त्याच्यासोबत पळून जातात. नंतर परत आल्यावर दोघेही सोबत राहणं सुरू करतात. यात कुटुंबाचीही काही हरकत नसते. उलट मुलाकडील लोक मुलीच्या परिवाराला काही पैसेही देतात. कपलवर लग्नाचा कोणताही दबाव टाकला जात नाही आणि या नात्यातून ते बाळालाही जन्म देऊ शकतात. जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत ते लग्नाबाबत विचारही करत नाही. बाळ जन्माला आल्यावरही हे त्यांच्या हाती असतं की, लग्न करायचं की नाही.

महत्वाची बाब म्हणजे तरूणीवर कोणत्याही एकाच तरूणासोबत जीवन जगण्याचा कोणताच दबाव नसतो. जर त्यांना सोबत रहायचं नसेल तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात. इतकंच नाही तर नवा साथीदार जुन्या साथीदारापेक्षा जास्त पैसे देतो. तेव्हा तरूणी त्याच्यासोबत जाऊ शकते. इथेही लग्नाचा कोणताही दबाव नसतो. अनेकांची लग्ने तर वृद्ध झाल्यावर त्यांची मुलं लावून देतात. बरेचजण लग्न न करताच तसेच आयुष्य सोबत घालवतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकी मॉडर्न प्रथा गरासिया समाजातील लोकांमध्ये आधी कुणी आणली असेल? अशी मान्यता आहे की, या समाजातील 4 भावांपैकी तिघांनी लग्ने केली होती. तर एक भाऊ एका तरूणासोबत असाच राहत होता. यातील तीन भावांना मुलं झाली नाहीत. पण चौथ्या भावाला अपत्य झालं. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं. या प्रथेला ‘दापा प्रथा’ असं म्हणतात. या प्रथेनुसार,  जेव्हाही लग्न होतं तेव्ह सगळा खर्च नवरदेवाच्या कुटुंबाला करावा लागतो आणि लग्नही नवरदेवाच्या घरी होतं.

Web Title: Girls get pregnant before wedding weird tradition around world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.