परदेशात जाताय? जाणून घ्या, पैसे वाचवण्याच्या युक्त्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 06:36 PM2022-05-11T18:36:21+5:302022-05-11T18:36:46+5:30
‘डिनर’ऐवजी ‘लंच’ला बाहेर जा. दिवसा भपकेबाजी करायला फारसा वाव नसल्यानं दुपारचं जेवण बऱ्याचदा स्वस्त असतं.
‘व्हेन इन रोम, डू ॲज द रोमन्स डू’.. अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाल, तिथल्यासारखेच होऊन राहा.. अर्थात आपल्या पूर्वजांनीही ही युक्ती कधीच सांगून ठेवली आहे.. तुम्ही कुठेही प्रवासाला विशेषत: परदेश प्रवासाला गेला असाल, जात असाल, तेव्हा ही युक्ती कायमच डोक्यात ठेवलेली बरी.. असं जर केलं, तर अनेक अफलातून गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल आणि खाण्याचे तर असे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील की ज्याचं नाव ते!
प्रवासाला गेलं की विशेषत: दोन गोष्टींसाठी आपला खिसा तपासून पाहावा लागतो तो म्हणजे खाणं आणि राहाणं.. पण तिथे गेल्यावर स्थानिक माणसासारखं राहून पाहा... तुमच्या खिशाला चाट तर बसणार नाहीच, शिवाय जो काही आनंद तुम्ही खिशात भरून आणाल तो वेगळाच. त्यासाठी खाण्याच्या आणि राहाण्याच्या आपल्या पूर्वकल्पना, समज आधी बाजूला काढून, त्याचं गाठोडं किमान तेवढ्या काळासाठी तरी माळ्यावर फेकून द्या. स्वस्तात आणि मस्त प्रवास करायचा म्हणजे, ‘गरिबा’सारखं, पोट आणि मन मारून राहायचं असं बिलकूल नाही. त्यासाठी आपण आपल्या अंगावर चढवलेली ‘टुरिस्ट’ची झूलही उतरवून ठेवावी लागेल.
१- पहिली गोष्ट, तुम्ही जिथे कुठे जाणार असाल तिथे जर कोणी तुमचे मित्र-मैत्रीण, नातेवाईक, ओळखीचे राहात असतील, तर त्यांना अवश्य विचारा, इथे राहायची आणि जेवणाची चांगली सोय कुठे होऊ शकेल? हे विचारायला बिलकूल लाजू नका. तुम्हाला काही त्यांच्याकडे जाऊन राहायचं नाही. त्यांनी बोलवलं तरी तुम्हीही जाणार नाही. त्यामुळे याबाबत त्यांचा सल्ला अवश्यक घ्या.
२- कुठल्याही जाहिराती पाहून तिथे जाण्याऐवजी ‘माऊथ पब्लिसिटी’चा जरुर वापर करा. अनेकांच्या तोंडून एखाद्या हॉटेलचं, एखाद्या टपरीवजा दुकानाचं, एखाद्या घरगुती जेवणाचं नाव निघालं, तर तिथे अवश्य भेट द्या.
३- स्थानिक लोकांमध्ये मिसळा. तिथल्या लोकांशी मैत्री करा. ही मैत्री नंतरही तुमच्या कामात येऊ शकते.
४- ‘ईटर’सारख्या वेबसाईट्स आणि ‘शेफ्सफीड’ (ChefsFeed)सारख्या ॲप्सवरही बरीच माहिती मिळू शकेल.
५- ‘डिनर’ऐवजी ‘लंच’ला बाहेर जा. दिवसा भपकेबाजी करायला फारसा वाव नसल्यानं दुपारचं जेवण बऱ्याचदा स्वस्त असतं.
६- स्ट्रीट फूड चूकवू नका..