प्लास्टिक कचरा द्या, सोन्याचं नाणं घेऊन जा... भारताच्या 'या' गावात सुरू आहे भन्नाट उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 08:34 PM2023-07-23T20:34:45+5:302023-07-23T20:35:01+5:30

आपले गाव प्लास्टिक कचरामुक्त करण्यासाठी सरपंचाने लढवली शक्कल

Gold Coin in exchange with plastic waste scheme in Indian Village has become talk of the town trending | प्लास्टिक कचरा द्या, सोन्याचं नाणं घेऊन जा... भारताच्या 'या' गावात सुरू आहे भन्नाट उपक्रम

प्लास्टिक कचरा द्या, सोन्याचं नाणं घेऊन जा... भारताच्या 'या' गावात सुरू आहे भन्नाट उपक्रम

googlenewsNext

Gold Coin for Plastic Waste: भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हणतात. येथील गावे स्वच्छ व नीटनेटकी असतील तर देशाचे चित्र बदलेल. भारतात अशी अनेक गावे आहेत, जिथे काही उत्कृष्ट उपक्रम राबवले जात आहेत. भारतात असेच एक गाव आहे, ज्या गावात लोक प्लास्टिकमुक्त पृथ्वीचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे गाव चर्चेचा विषय राहिले आहे. येथे तुम्हांला प्लास्टिकचा कचरा दिल्याबद्दल सोनं दिलं जातं. त्यामुळेच सध्या हे गाव प्लास्टिकमुक्त आहे.

कुठे आहे हे गाव?

हे गाव सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. त्याचे नाव सदिवरा. येथील सरपंचांनी प्लास्टिकमुक्त करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला. गावचे सरपंच फारुख अहमद गणई यांना गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे, व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र फारसे यश मिळाले नाही. मात्र 'प्लास्टिक दो और सोना लो' अशी घोषणा केल्याने लोकांची गर्दी झाली. ही गोष्ट जाहीर होताच तेथील लोक या उपक्रमात सहभागी होत आहेत.

नक्की काय आहे उपक्रम?

सरपंचांनी 'प्लास्टिक दो और सोना लो' ही मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येते. या योजनेंतर्गत 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही त्याचा अवलंब केल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे या गावचे सरपंच सांगतात की, मी माझ्या गावात पॉलिथिनच्या बदल्यात  बक्षिस देण्याचा नारा दिला, जो यशस्वी झाला. नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. इतर काही गावांची चर्चा इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आली आहे, जिथे प्लास्टिक कचरा दूर करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग म्हणजे सोने देणे. त्यात बऱ्यापैकी यशही आले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Gold Coin in exchange with plastic waste scheme in Indian Village has become talk of the town trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.