या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:34 PM2023-04-10T12:34:06+5:302023-04-10T12:38:28+5:30
Gold Forest : हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो.
Gold Forest : पेरूच्या अॅमेझॉन जंगलाचे नुकतेच अंतराळातून फोटो घेण्यात आले. फोटो जेव्हा डेव्हलप केले गेले तेव्हा समजलं की, इथे तर सोन्याचा खजिना आहे. चारही बाजूने सोनंच सोनं आहे. हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो.
सोन्याच्या जंगलाचा हा फोटो पेरूच्या माद्रे-दे-दियोस प्रांतातील आहे. हे अॅमेझॉनच्या वर्षावनातील एक राज्य आहे. या पूर्ण परिसरात पाणी, दऱ्या, तलाव आणि नद्या आहेत. या फोटोत डावीकडे एक नदी दिसत आहे. त्याशिवाय जंगलामध्ये सोन्याच्या रंगाचे खड्डे बेकायदेशीर उत्खनन दाखवतात. यासाठी जंगलातील झाडे कापली जातात. सोन्याचं हे जंगल 15 किलोमीटर लांब आहे.
पेरू जगातील सहावा सोन्याचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. माद्रे-दे-दियोस सगळ्यात मोठं स्वतंत्र खनन केंद्र आहे. याच खननामुळे अॅमेझॉनचं जंगल कापलं जातं. सोनं काढण्यासाटी मरकरीचा वापर केला जातो. ज्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हैराण करणारी बाब म्हणजे या जंगलातून सोनं काढणारे हजारो परिवार असंच आपलं जीवन जगतात.
फोटोत एक छोटा परिसर नुएवा दिसत आहे. जो साउदर्न इंटरओसिएनिक हायवेजवळ आहे. हा हायवे 2011 सालात बनला होता. हा एकच मार्ग आहे जो ब्राझीलला पेरूसोबत जोडतो. हा रस्ता व्यापार आणि पर्यटनासाठी तयार करण्यात आला होता. पण आता याचा वापर बेकायदेशीर उत्खनन आणि जंगल्याच्या कटाईसाठी केला जातो.
या ठिकाणावर जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा जंगलातील सोन्याची ही खाण चमकू लागते. अंतराळातून पाहिल्यावर दिसतं की, जणू काही सोन्याची नदी वाहत आहे. हे ठिकाण वरून नदीसारखं दिसतं. पण यात सोन्याच्या खाणीचे खड्डे आहेत. त्याबाजूला जंगल आहे.
या भागात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, इथे जंगलाची कटाई सुरू आहे. ज्यामुळे अॅमेझॉन आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं नुकसान होतं. इथे पुराची देखील समस्या वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. कारण सोनं स्वच्छ करण्यासाठी मिथाइलमरकरीचा वापर होतो. याने जंगलाचं नुकसान होतं.