याला म्हणतात नशीब! सोनं समजून वर्षानुवर्ष जपून ठेवला दगड; सत्य समजलं, आयुष्यच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 02:36 PM2022-11-26T14:36:56+5:302022-11-26T14:38:42+5:30

दगडाच्या चारही बाजूंना पिवळ्या रंगाची माती होती. डेविड यांनी दगड धुतला तेव्हा त्यांना हा दगड सोन्याचा आहे असं वाटलं. 

gold rock turns out valuable rare meteorite | याला म्हणतात नशीब! सोनं समजून वर्षानुवर्ष जपून ठेवला दगड; सत्य समजलं, आयुष्यच बदललं

फोटो - आजतक

googlenewsNext

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये असलेल्या मॅरिबोरो पार्कमध्ये डेविड होल प्राचीन वस्तू आणि खनिजं शोधत आहेत. त्यावेळी त्यांना एक असाधारण वस्तू सापडली. एक लाल रंगाचा वजनदार दगड होल यांना आढळला. 2015 मधील ही घटना आहे. दगडाच्या चारही बाजूंना पिवळ्या रंगाची माती होती. डेविड यांनी दगड धुतला तेव्हा त्यांना हा दगड सोन्याचा आहे असं वाटलं. 

मॅरीबोरो ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या भागात येतं. या भागात 19 व्या शतकात सोन्याच्या मोठमोठ्या खाणी होत्या. आताही येथे अनेकदा लोकांना लहान मोठे सोन्याचे दगड मिळतात. मात्र डेविड यांच्या हाती त्याहून मोठा खजिना लागला. डेविड यांनी दगड कापण्याचे, फोडण्याचे, तोडण्याचे प्रयत्न केले. मात्र दगड अखंड राहिला. डेविड यांना सोन्याचा वाटलेला दगड सोन्याचा नव्हताच. कित्येक वर्षांनंतर डेविड तो दगड घेऊन मेलबर्न म्युझियममध्ये घेऊन गेले. 

डेविड दगड समजत असलेली वस्तू दुर्मिळ उल्कापिंड होती. दुसऱ्या जगातून ते ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पडलं होतं. डेविड यांना सापडलेलं उल्कापिंड अतिशय मौल्यवान असल्याचं मेलबर्न म्युझियमचे जियोलॉजिस्ट डर्मोट हेनरी यांनी सांगितलं. डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची किंमत ठरवताच येणार नाही. कारण त्यात असलेला धातू पृथ्वीवर मिळतच नाही, असं हेनरी म्हणाले. हेनरी 37 वर्षांपासून म्युझियममध्ये कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी अनेक दगडांची तपासणी केली आहे. उल्कापिंडदेखील तपासले आहेत.

मी आतापर्यंत हजारो उल्कापिंडांची तपासणी केली आहे. पण असा दगड आजपर्यंत पाहिला नाही. डेविड यांना सापडलेलं उल्कापिंड अत्यंत मौल्यवान आहे. त्याची किंमत निश्चित केली जाऊ शकत नाही, असं हेनरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची तपासणी केली. हे उल्कापिंड 460 कोटी वर्ष जुनं आहे. त्याचं वजन 17 किलो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gold rock turns out valuable rare meteorite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.