बाबो! 'इथे' लावला जाणार सोन्याचा कमोड, सर्वसामान्य लोकही करू शकतील वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:08 PM2019-05-04T15:08:38+5:302019-05-04T15:19:23+5:30

काही दिवसांपूर्वीच आपण जपानमध्ये एक सोन्याचा बाथटब लावल्याची बातमी वाचली होती.

Gold toilet installed in Britain palace | बाबो! 'इथे' लावला जाणार सोन्याचा कमोड, सर्वसामान्य लोकही करू शकतील वापर!

बाबो! 'इथे' लावला जाणार सोन्याचा कमोड, सर्वसामान्य लोकही करू शकतील वापर!

Next

काही दिवसांपूर्वीच आपण जपानमध्ये एक सोन्याचा बाथटब लावल्याची बातमी वाचली होती. आता यूनायटेड किंगडममधील ब्लेनहीम पॅलेसमध्ये सोन्याचा कमोड लावला जाणार आहे. हा कमोड ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्या कक्षाजवळ लावला जाणार आहे. 'द गार्डियन' ने दिलेल्या वृत्तानुसार, हा कमोड १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. 

ऑक्सफोर्डशायर स्थित ब्लेनहीम पॅलेस हे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांचं घर आहे. ब्लेनहीम आर्ट फाउंडेशनचे संस्थापक स्पेंसर चर्चिल यांनी सांगितले की, 'या टॉयलेट सीटच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली जाईल. हा कमोड मॉरिजो कॅटिलेन यांनी तयार केला आहे'.

(Image Credit : Ritz Magazine)

मीडिया रिपोर्टनुसार, या कमोडचा वापर येथील सामान्य नागरिकही करू शकतात. पण त्यासाठी आधीच बुकिंग करावी लागणार आहे. या कमोडची चर्चा याआधीही रंगली होती. त्यावेळी गुगेनहिम संग्रहालयाने हा कमोड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याचा इच्छा व्यक्त केली होती. 

(Image Credit : Sky News)

सर्वसामान्य जनतेसाठी हा खुला केला जाईल, कारण या इमारतीला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंदवलं आहे. ब्लेनहीम पॅलेसमध्ये लावली जाणारी ही टॉयलेट सीट तिथे होणाऱ्या प्रदर्शनाचा भाग असणार आहे. एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत १ लाख लोकांनी ही टॉयलेट सीट पाहिली आणि सोन्यापासून तयार या कमोडसोबत सेल्फी काढला.  

Web Title: Gold toilet installed in Britain palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.