VIDEO : शेविंग ट्रिमरमध्ये लपवून ठेवली होती इतकी किंमत वस्त, तुम्ही कल्पनाही केली नसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:05 PM2021-12-27T16:05:03+5:302021-12-27T16:06:59+5:30
कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडे २५ लाख रूपयांचं सोनं होतं. त्याची बॅग एक्स-रे मशीनमध्ये ठेवल्यावर त्याच्यावर संशय आला होता.
सोने तस्करीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात शेविंग ट्रिमरमधून सोनं काढताना दाखवलं जात आहे. जगभरातून सोने तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. पण अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच समोर आली, ज्यात एका ट्रिमरमध्ये सोनं भरून एका देशातून दुसऱ्या देशात आणलं जात होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडे २५ लाख रूपयांचं सोनं होतं. त्याची बॅग एक्स-रे मशीनमध्ये ठेवल्यावर त्याच्यावर संशय आला होता.
जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर शारजाहवरून एअर अरबियाने आलेल्या एका प्रवाशावर कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला. एक्स-रे मशीनमध्ये बॅगमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसली. आधी तर चौकशी दरम्यान प्रवाशाने त्याच्याकडे धातुची कोणतीही वस्तू नसल्याचं सांगितलं होतं.
जशी अधिकाऱ्यांनी बॅग चेक केलं ते बघून हैराण झाले. एक्स-रे मशीनमध्ये स्कॅन केल्यानंतर कटर मशीनने ट्रिमर मशीन कापलं. त्यातून तब्बल ४९१ ग्रॅम सोनं निघालं. प्रवाशाने सोने तस्करीसाठी शेविंग ट्रिमरच्या आत बॅटरीऐवजी सोन्याचे बिस्कीट लपवले होते.
सोन्याचे हे बिस्कीट अनेक थरांच्या ब्लॅक कार्बन प्लास्टिक शीटमध्ये लपवलं होतं. अधिकाऱ्यांना सोन्याचे चार बिस्कीट सापडले. एका बिस्कीट प्रवाशाच्या साहित्यात सापडलं. ही सगळी बिस्कीटं ब्लॅक कार्बन प्लास्टिक शीटमध्ये पॅक केले होते. एकूण सोन्याचं वजन ४९१ ग्रॅम आहे तर याची किंमत २५ लाख रूपये आहे.