ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:06 PM2022-11-23T15:06:25+5:302022-11-23T15:08:05+5:30

Swarnrekha Nadi: सोनं सापडणारी ही नदी झारखंड राज्यात वाहते आणि या नदीचं नावही स्वर्णरेखा नदी आहे. सोनं सापडत असल्यानेच या नदीला स्वर्णरेखा नदी म्हटलं जातं आणि झारखंडशिवाय ही नदी पश्चिम बंगाल व ओडिशामध्येही वाहते.

Golden river of India gold flows with water in Swarnrekha Nadi | ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी

ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी

googlenewsNext

Swarnrekha Nadi: भारत हा नद्यांचा देश म्हणूनही ओळखला जातो. देशात शेकडो नद्या आहेत. ज्यावर लोकांचं जीवन अवलंबून आहे. पण भारतात अशीही एक नदी आहे, ज्यातून सोनं निघतं. नदीच्या आजूबाजूला राहणारे लोक यातून सोनं काढून आपलं जीवन जगतात. त्यातून पैसे कमावतात. या नदीत सोनं कुठून येतं हे समजू शकलेलं नाही. अनेक वैज्ञानिकांनीही यावर अभ्यास केला, पण त्यांनाही काही समजलं नाही.

सोनं सापडणारी ही नदी झारखंड राज्यात वाहते आणि या नदीचं नावही स्वर्णरेखा नदी आहे. सोनं सापडत असल्यानेच या नदीला स्वर्णरेखा नदी म्हटलं जातं आणि झारखंडशिवाय ही नदी पश्चिम बंगाल व ओडिशामध्येही वाहते. या नदीचा उगम झारखंडची राजधानी रांचीपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. ही नदी थेट बंगालच्या खाडीमध्ये संपते.

झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी ज्या भागातून वाहते तिथे सकाळी लोक पोहोचतात आणि वाळू गाळून त्यातून सोनं जमा करतात. यातील तर काही लोक अनेक पिढ्यांपासून सोनं जमा करतात. इतकंच नाही तर नदीतून सोनं काढण्यासाठी पुरूष आणि महिलांसोबत लहान मुलेही जातात.

स्वर्णरेखा नदी (Swarnrekha River) मध्ये सोनं कुठून येतं हे अजूनही रहस्यच आहे.  स्वर्णरेखा नदी डोंगर दऱ्यातून वाहत येते आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की, इथूनच सोन्याचे कण यात वाहून येतात. पण याबाबत काहीच ठोस अशी माहिती मिळाली नाही.

स्वर्णरेखा नदी (Swarnrekha River) ची एक उपनदीही आहे. ज्यातून सोनं निघतं.  स्वर्णरेखा नदीची उपनदी करकरीमधूनही सोन्याचे कण निघतात आणि इथेही लोक सोनं जमा करण्यासाठी जातात. एक अंदाज असाही आहे की,  स्वर्णरेखा नदीमध्ये सोनं करकरी नदीमधूनच येतं.

Web Title: Golden river of India gold flows with water in Swarnrekha Nadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.