खुशखबर ! आता अँड्रॉईडवरुनही करा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 08:14 AM2016-10-26T08:14:33+5:302016-10-26T12:41:37+5:30

मेसेजिंग अॅपमध्ये अग्रेसर असलेल्या व्हॉट्सअॅपने आता व्हिडीओ कॉलिंग सेवाही सुरु केली आहे. फक्त विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारं हे नवं फिचर अँड्रॉईडरवही उपलब्ध झालं आहे.

Good news! Now let's make WhatsApp video call from Android | खुशखबर ! आता अँड्रॉईडवरुनही करा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल

खुशखबर ! आता अँड्रॉईडवरुनही करा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - मेसेजिंग अॅपमध्ये अग्रेसर असलेल्या व्हॉट्सअॅपने आता व्हिडीओ कॉलिंग सेवाही सुरु केली आहे. फक्त विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारं हे नवं फिचर अँड्रॉईडरवही उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फक्त मेसेज नाही तर व्हिडीओ कॉलही करु शकतो. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या पाहता हे फिचर खूपच उपयोगी पडेल यामध्ये दुमत नाही.
 
(अखेर व्हॉटसअ‍ॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग सुरु)
 
सध्या मेसेजिंग अ‍ॅपची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अ‍ॅपची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अ‍ॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवीन नवीन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या वाढतच आहे. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट देत व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं. सुरुवातील फक्त विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारं हे फिचर आता अँड्रॉईड युझर्सनाही उपलब्ध झालं आहे. 
तस बघीतले तर मेसेंजिंग अ‍ॅपच्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही . कारण या अगोदर स्नॅपचॅट, फेसबुक मेसेंजर, व्हायबर, हँगआउट तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे. 
 

Web Title: Good news! Now let's make WhatsApp video call from Android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.