टाईमपासच्या नादात युवकानं बनवली 'जुगाड टेक्नोलॉजी'; Google नं नोकरीची ऑफरच दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 05:13 PM2023-04-28T17:13:17+5:302023-04-28T17:14:03+5:30
हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली
नवी दिल्ली - असं म्हटलं जातं, मेहनतीला तोड नाही. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अक्षय नारिसेटी नावाच्या युवकाला हे अनुभवायला मिळाले. हैदराबाद इथं इंजिनिअरींगचं शिक्षण करणाऱ्या अक्षयनं गूगलचा एक नंबर गेम क्रॅक केला. हा नंबर गेम गुगल तेव्हा खेळण्याचं ऑप्शन देते जेव्हा क्रोम ब्राऊजरला इंटरनेट कनेक्टिविटी मिळत नाही.
हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुगलच्या HR टीमकडून या युवकाला जॉबची ऑफर देण्यात आली आहे. युवकाने ही टेक्नोलॉजी कशी बनवली याबाबत काही कळू शकले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जो स्वत: युवकाने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
This Project got me an interview at Google. pic.twitter.com/o4I1OVfHny
— Akshay Narisetti (@AkshayNarisetti) April 27, 2023
Google च्या HR टीमने काय म्हटलं?
Google कडून अक्षयला जॉब ऑफर करणारा ईमेल आला. ज्यात म्हटलंय की, आशा आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे. मी गुगलच्या टेक हायरिंग टीममध्ये काम करते. मी तुमचा डिनो गेम पाहून आश्चर्यचकीत झाले. जर आपल्याला गुगलसोबत करिअर बनवायचं असेल तर तुमचा सीवी पाठवून द्या. आम्ही तुमच्यासाठी योग्य पदाची ऑफर करू असं त्यात सांगितले. आहे. या इंजिनिअर युवकाने ट्विटरवर म्हटलंय की, मी ७ वेळा इंटर्न होतो. आता चौथ्या सेमिस्टरमध्ये आहे. मी क्लाऊड मशिनवर काम करतो.
भारतात नाही टॅलेंटची कमी
कठोर परिश्रम, जिद्द व मेहनत आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र केले तर माणूस काहीही करू शकतो. असाच एक प्रयोग वाशिम जिल्ह्यातील अमरदास नगर येथील २१ वर्षीय साबीर खान बाली खान याने केला. त्याने भंगारातून जुगाड करत इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली. यासाठी त्याला २५ हजार रुपये खर्च आला असून ४० किमी मायलेज देत असल्याचा साबीरचा दावा आहे.
लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची इच्छा असलेल्या साबीरने स्वत:साठी इलेक्ट्रॉनिक बाईक बनवली. जंक वस्तू आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून त्याने सायकल बाईक बनवून सर्वांनाच चकित केले. सध्या मजुरीचे काम करणाऱ्या साबीरचे लहानपणापासूनच स्वप्न होते की, मोठे होऊन स्वत:साठी अशी सायकल बाईक बनवावी, जी पेट्रोलशिवाय चालेल. अखेर १५ दिवसांच्या मेहनतीनंतर त्याचे स्वप्न साकार झाले आणि ही सायकल तयार झाली.