Google Map नं धोका देणाऱ्या पत्नीचं सत्य उघड केलं; नको त्या स्थितीत पतीला दिसली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:14 PM2023-09-07T17:14:43+5:302023-09-07T17:15:00+5:30

गुगल मॅपमध्ये नेहमी रस्त्यांचे काही फोटो झूम इन करूनही पाहू शकता. हे पाहत असतानाच व्यक्तीला त्याची पत्नी दिसली

Google Map reveals the truth about the threatening wife; She saw her husband in an undesirable position | Google Map नं धोका देणाऱ्या पत्नीचं सत्य उघड केलं; नको त्या स्थितीत पतीला दिसली

Google Map नं धोका देणाऱ्या पत्नीचं सत्य उघड केलं; नको त्या स्थितीत पतीला दिसली

googlenewsNext

Google Map मुळे अनेकांना रस्ते शोधण्यास सोपे झाले आहे. मॅपच्या आधारे कुठेही कुणालाही न विचारता तुम्ही पोहचू शकता. परंतु अनेकदा या मॅपमुळे काही असे पाहायला मिळते ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल. एका व्यक्तीसोबत नेमके हेच घडले जेव्हा त्याने घरातून बाहेर पडल्यानंतर गुगल मॅप पाहिले त्यात जे काही दिसले त्याने त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

गुगल मॅपमध्ये नेहमी रस्त्यांचे काही फोटो झूम इन करूनही पाहू शकता. हे पाहत असतानाच व्यक्तीला त्याची पत्नी दिसली. ती ज्या अवस्थेत होती ते पाहून पतीचा संताप अनावर झाला. या घटनेनंतर पतीला पत्नीविरोधात घटस्फोट घ्यावा लागला. रस्त्याशेजारी असलेल्या बेंचवर पतीने पत्नीला परपुरुषासोबत इंटिमेट होताना पाहिले आपल्या पत्नीचे हे फोटो त्याने गुगल मॅपद्वारे पाहिले होते.

पत्नी दुसऱ्या पुरुषाचे डोके मांडीवर ठेऊन त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत होती. पेरूची राजधानी लीमा येथील हा फोटो गुगल कॅमेऱ्याने क्लिक केला. पतीने जेव्हा हा फोटो झूम करून पाहिला तेव्हा या महिलेने तेच कपडे घातले होते जे त्याच्या पत्नीकडे होते. हा फोटो २०१३ चा आहे जो पतीने आता पाहिला होता. याचा अर्थ गेल्या अनेक वर्षापासून पत्नी पतीला धोका देत होती. या फोटोचे सत्य उघड झाल्यानंतर पतीसमोर पत्नीने तिच्या अफेअरची कबुली दिली. सध्या या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीने अलीकडेच फेसबुकवरून फोटो शेअर केले. या फोटोवर युझर्सने कमेंट्स केले आहेत. ही दुनिया किती छोटी आहे अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Web Title: Google Map reveals the truth about the threatening wife; She saw her husband in an undesirable position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.