अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:59 PM2019-10-08T15:59:45+5:302019-10-08T16:02:01+5:30

गुगल ट्रान्सलेटरकडून भन्नाट भाषांतर

google Translate Shows Ambani In Romanian Means I Have Money | अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

Next

मुंबई: एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपण अनेकदा गुगलचा आधार घेतो. विशेष म्हणजे जगातील अनेक भाषांमधील शब्दांचे अर्थ गुगल ट्रान्सलेशन सांगू शकतं. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात गुगल ट्रान्सलेशनचा वापर करणाऱ्यांची प्रचंड आहे. मात्र सध्या गुगल ट्रान्सलेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. 

मुकेश अंबानी यांचं नाव माहीत नसलेली व्यक्ती सापडणं तसं अवघडच. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांसह जगाला अंबानी हे आडनाव माहीत आहे. धीरुभाई अंबानी यांनी अत्यंत कष्टानं रिलायन्सचं साम्राज्य उभं केलं. मात्र गुगल ट्रान्सलेटर पाहिल्यावर अंबानी या आडनावातच पैसा आहे की काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. यामागचं कारण म्हणजे अंबानी शब्द रोमानियनमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्यास गुगल ट्रान्सलेटर 'आय हॅव्ह मनी' (माझ्याकडे पैसा आहे) असं आऊटपूट मिळतं. 



अंबानी शब्दाचा पहिला स्क्रीनशॉट पहिल्यांदा रेडिटवर आला. त्यानंतर हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. फोर्ब्स मासिकानं दिलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात मुकेश अंबानींची संपत्ती 51.1 बिलियन डॉलर होती. भारतीय चलनात रुपांतर केल्यास ही रक्कम 36,12,10,05,00,000 रुपये इतकी होते. जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत ते १३ व्या स्थानी आहेत. 

रिलायन्स समूहाची स्थापना करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचं 2002 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे दोन पुत्र मुकेश आणि अनिल यांच्यामध्ये संपत्तीची विभागणी झाली. यापैकी मुकेश यांचं उद्योग जगतातलं स्थान अतिशय मोठं आहे. तेल आणि वायू क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यावर २०१६ मध्ये मुकेश यांनी जिओची घोषणा केली. जिओनं अवघ्या काही दिवसांत दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवली. 
 

Web Title: google Translate Shows Ambani In Romanian Means I Have Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.