अरे देवा!  हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 08:47 PM2021-02-09T20:47:11+5:302021-02-09T20:48:19+5:30

Viral Trending news in Marathi : तुम्हाला वाचून हा प्रकार फारच विनोदी वाटेल, पण महिनाभरानंतरही या मुलीचे केस  चांगले झालेले नाहीत. 

Gorilla glue said its sorry to hear about tessica brown who accidentally glued her hair in place | अरे देवा!  हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...

अरे देवा!  हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...

Next

लाईक्स, शेअर व्यूजच्या जमान्यात लोक प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा त्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोक्याचं कारण ठरू शकतो.  सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र स्टंट केलेल्या मुलीबाबत सांगणार आहोत. अमेरिकेतील लुयसियानातील रहिवासी असलेल्या टेसिका ब्राऊन नावाच्या मुलीनं  हेअर स्प्रे संपल्यामुळे आपल्या केसांना ग्लोरिल्ला ग्लू म्हणजे चिकटवायचा गम लावण्याची चूक केली आहे. तुम्हाला वाचून हा प्रकार फारच विनोदी वाटेल, पण महिनाभरानंतरही या मुलीचे केस चांगले झालेले नाहीत. 

रिपोर्टनुसार टेसिका ब्राऊन यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला दिलेल्या माहितीनुसार तिचे केस स्काल्पला चिकटून एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे.  कारण तिने चुकून केसांना गोरिल्ला ग्लू लावला  होता. तिनं आपल्या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ''माझे केस जराही हलत नाही. तुम्ही ऐकत आहात ना मी काय बोलते आहे.'' या व्हिडीओमध्ये  ही महिला शॅम्पूने केस धुवून सुद्धा दाखवते. पण शॅम्पूचा कोणताही परिणाम केसांवर होत नाही.

या व्हिडीओमध्ये सांगते की, ''असं होईल असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. माझा हेअर स्प्रे संपला होता म्हणून मी केसांना ग्लू लावला. मी ही खूप मोठी चूक केली आहे. आता माझे केस जरासुद्धा हलत नाहीत १५ वेळा धुवूनही केसांवर काही फरक जाणवला नाही. ''

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  गोरिल्ला कंपनीने ट्विट केलं आहे की, या घटनेबाबत ऐकून आम्हाला खूप दुःख झाले.  कारण या बाईंनी आमच्या स्प्रे चा उपयोग केसांवर केला आहे. हा व्हिडीओ पाहून आम्हाला आनंदही झाला आहे की, त्या आपले उपचार करून घेत आहेत. आमची प्रार्थना त्यांच्या सोबत आहे.खरंच? रबरासारखं लवचीक आहे १३ वर्षांच्या चिमुरडीचं शरीर; लॅपटॉप चालवणं, होमवर्क सगळं काही करते पायानं

गोरिल्ला ग्लू च्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ग्लू  हा १०० टक्के वॉटरप्रुफ आहे.  या ग्लू चा वापर बाथरूमच्या टाईल्स, वुडन फ्लोरिंगवर वापरला जातो. हा ग्लू किती प्रभावी आहे याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही.  म्हणून शरीराच्या कोणत्याही भागावर या स्प्रेचा वापर करण्याआधी विचार करा. दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस


 

Web Title: Gorilla glue said its sorry to hear about tessica brown who accidentally glued her hair in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.