'या' सुंदर शहरात जाऊन राहणाऱ्यांना मिळतील 25 लाख, सरकारकडून खास ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:46 PM2022-12-12T19:46:41+5:302022-12-12T19:47:27+5:30
अलिकडच्या वर्षांत इटलीच्या सभोवतालची अनेक शहरे लोकांना तेथे येण्यासाठी आणि राहण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम आणि कल्पना सादर करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
नवी दिल्ली : उत्पन्न असो वा नसो, चांगल्या ठिकाणी राहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमचे हे स्वप्न कोणत्याही प्रयत्नाशिवाय पूर्ण झाले तर? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करत असेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की, लोकांना इटलीतील एका शहरात स्थायिक होण्यासाठी 30,000 युरोची ऑफर दिली जात आहे. 30 हजार युरो म्हणजेच 25 लाख रुपये होतात. या शानदार डीलबद्दल जाणून घ्या...
अलिकडच्या वर्षांत इटलीच्या सभोवतालची अनेक शहरे लोकांना तेथे येण्यासाठी आणि राहण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम आणि कल्पना सादर करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण-पूर्व इटलीतील प्रेसिकेस शहराच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात स्पष्टपणे लिहिले आहे की, शहरातील रिकाम्या घरांमध्ये राहण्यास होणार देणाऱ्यांना घर खरेदी आणि दुरुस्तीसाठी 30 हजार युरो दिले जातील.
ही रक्कम केवळ घर खरेदी आणि निवासस्थान घेण्यासाठी दिली जात आहे. दरम्यान, या ऐतिहासिक शहरातून लोकांचे वेगाने स्थलांतर झाले. त्यामुळे येथील लोकसंख्या खूप कमी झाली आहे. जुन्या शहराची संस्कृती जिवंत राहावी आणि येथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढत राहावी, हे या निर्णयामागचे कारण आहे. येथे राहणारे लोक घरे सोडून इतरत्र स्थायिक झाले. येथील अनेक घरे अनेक दिवसांपासून रिकामी आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे शहर सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय आकर्षक आहे. सुंदर निळे पाणी आणि नैसर्गिक सौंदर्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.
स्थानिक नगरसेवक अल्फ्रेडो पॅलिस यांनी सांगितले की, 1991 पूर्वी बांधलेल्या ऐतिहासिक केंद्रात अनेक रिकामी घरे आहेत, जी आम्हाला नवीन रहिवाशांसह पुन्हा पहायची आहेत. इतिहास, अप्रतिम स्थापत्य आणि कलेने भरलेले आपले जुने जिल्हे हळूहळू कसे रिकामे होत आहेत हे खेदजनक आहे.दरम्यान, टाऊन हॉलने पूर्वी रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रम ऑफर केले होते, जसे की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर प्रोत्साहन आणि मुले असलेल्या कुटुंबांसाठी बेबी बोनस.