जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन, जिथे बनवला आहे एक सीक्रेट प्लॅटफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 09:34 AM2023-07-29T09:34:04+5:302023-07-29T09:34:21+5:30

Grand Central Terminal :जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन हे Grand Central Terminal स्टेशन आहे.

Grand central terminal is largest railway station in the world know more | जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन, जिथे बनवला आहे एक सीक्रेट प्लॅटफॉर्म

जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन, जिथे बनवला आहे एक सीक्रेट प्लॅटफॉर्म

googlenewsNext

Grand Central Terminal :  भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन मानलं जातं. रेल्वेचा वापर लोकांच्या प्रवासासोबत माल वाहून नेण्यासाठीही केला जातो. रोज लाखोंच्या संख्येने रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. भारतातील सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन कोलकात्यामधील हावडा रेल्वे स्टेशन आहे. येथील प्लॅटफार्मची एकूण संख्या 26 आहे.

जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन

भारतात तर तुम्ही अनेक मोठी रेल्वे स्टेशन पाहिली असतील, पण जगातील सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं हे तुम्हाला माहीत नसेल. जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन हे Grand Central Terminal स्टेशन आहे. हे मॅनहॅटन न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे. या रेल्वे स्टेशनचं निर्माण 1903 पासून ते 1913 दरम्यान झालं होतं. Grand Central Terminal स्टेशनवर एकूण 44 प्लॅटफार्म आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इथून रोज 660 पेक्षा जास्त मेट्रो ट्रेन्स जातात.

आहे एक गुप्त प्लॅटफॉर्म ?

Grand Central Terminal स्टेशनवर एक गुप्त प्लॅटफार्म सुद्धा आहे. जे फार  सीक्रेट ठेवण्यात आलं आहे. इथे सामान्य लोकांना जाण्यास मनाई आहे. असं मानलं जातं की, हा प्लॅटफॉर्म Waldorf Astoria हॉटेलच्या अगदी खाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, या प्लॅटफार्मचा वापर तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रेंकलिन डी रूजवेल्ट करत होते. 

Grand Central Terminal स्टेशनबाबत अनेक इंटरेस्टिंग दावे केले जातात. असं सांगण्यात येतं की, इथे येणाऱ्या प्रवाशांच्या वस्तू हरवण्याची संख्या दरवर्षी साधारण 19 हजारांच्या आसपास असते. यातील 60 वस्तू अशा असतात ज्या त्यांच्या मालकांकडे परत पाठवल्या जातात.

Web Title: Grand central terminal is largest railway station in the world know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.