'इथे' मृतदेह दफन करण्यासाठी विकत घ्यावी लागते जमीन, किंमत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:14 PM2019-09-24T12:14:42+5:302019-09-24T12:21:32+5:30

सामान्यपणे मृतदेह दफन करण्यासाठी स्मशानभूमीत जागा असते. भारतात तरी कोणत्याही स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याची माहिती नाही.

Grave shortage in Hongkong it costs more to house the dead than the living | 'इथे' मृतदेह दफन करण्यासाठी विकत घ्यावी लागते जमीन, किंमत वाचून व्हाल अवाक्....

'इथे' मृतदेह दफन करण्यासाठी विकत घ्यावी लागते जमीन, किंमत वाचून व्हाल अवाक्....

googlenewsNext

(Image Credit : Social Media)

सामान्यपणे मृतदेह दफन करण्यासाठी स्मशानभूमीत जागा असते. भारतात तरी कोणत्याही स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याची माहिती नाही. पण जगात असाही एक देश आहे, जिथे मृतदेह दफन करण्यासाठी चक्क जमीन खरेदी करावी लागते. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे इथे जमिनीचा एक छोटा तुकडा घेण्यासाठीही कोट्यवधी रूपये मोजावे लागतात.

हॉंगकॉंग देशात सध्या जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. इथे लोकांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा विकत घ्यावी लागते आणि जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी त्यांना साधारण १ कोटी ५८ लाख रूपये इतकी किंमत चुकवावी लागते. 

(Image Credit : Social Media)

इथे जागेचा भाव महाग असल्याने लोकांनी मृतदेह दफन करण्याऐवजी त्यांना मुखाग्नी देणं सुरू केलं आहे. पण यातही एक समस्या आहे. आणि ती म्हणजे लोक मृतदेहाला तर अग्नी देतात, पण त्यांना अस्थी दफन करायची असते.

(Image Credit : Social Media)

अशात वाढत्या जमिनीच्या किंमतीमुळे लोक इथे व्यक्तीची राख सरकारी लॉकर्समध्ये ठेवत आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, हॉंगकॉंगमध्ये साधारण चार लाख लोकांची अस्थी दफन करण्याच्या प्रतिक्षेत आहे. मृतदेहांची ही राख लॉकर्समध्ये ठेवण्यात आली आहे.

(Image Credit : Social Media)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी लॉकर्समध्ये अस्थी ठेवण्यासाठी लोकांना वर्षाला २२ हजार रूपये द्यावे लागतात. त्यातही अडचण ही आहे की, लॉकर्समध्ये अस्थी ठेवण्यासाठीही चार चार वर्ष लोकांना वाट बघावी लागते.

(Image Credit : Social Media)

पण इथे सरकारी लॉकर्समध्ये जागा असल्याने लोक यात अस्थी ठेवू लागले आहेत. हे लॉकर्स शूजच्या डब्याच्या आकाराचे असतात. ज्यात थोडीच जागा असते.

Web Title: Grave shortage in Hongkong it costs more to house the dead than the living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.