लॉकडाऊनमुळे गेली नोकरी तर स्मशानभूमीला बनवलं घर, अंत्यसंस्कार करून भरतो परिवाराचं पोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:19 AM2021-04-24T10:19:38+5:302021-04-24T10:25:18+5:30

ते इथे राहून मृत झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचीही जबाबदारी पार पाडत आहे. या कार्यात त्याची पत्नीही पतीला साथ देत आहे.

Graveyard working home family jobless man funeral dead bodies Vadodara Gujarat | लॉकडाऊनमुळे गेली नोकरी तर स्मशानभूमीला बनवलं घर, अंत्यसंस्कार करून भरतो परिवाराचं पोट!

लॉकडाऊनमुळे गेली नोकरी तर स्मशानभूमीला बनवलं घर, अंत्यसंस्कार करून भरतो परिवाराचं पोट!

Next

कोरोना महामारीत स्मशानभूमीत मृतदेहांची लाइन लागली आहे. येथील चित्र फारच भयावह आहे. लोक नाइलाजाने आपल्या लोकांच्या अंत्यसंस्काराला येत आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला एका अशा कपलबद्दल सांगणार आहोत ज्यांनी महामारीत नोकरी गेल्यावर स्मशानभूमीलाच आपलं घर बनवलं आहे. ते इथे राहून मृत झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचीही जबाबदारी पार पाडत आहे. या कार्यात त्याची पत्नीही पतीला साथ देत आहे.

गुजरातच्या वडोदरा येथील स्मशानभूमीत राहणाऱ्या या कपलची सध्या चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील या व्यक्तीचं नाव आहे कन्हैयालाल शिर्के. कन्हैयालाल शिर्के स्मशानभूमीत मृतदेहांसोबत येणाऱ्या लोकांचं दु:खं तर कमी करू शकत नाही, पण त्यांच्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नक्कीच घेतो. कोरोनामुळे नोकरी गेल्यावर शिर्केने स्मशानभूमीला आपलं घर केलं आहे.

महाराष्ट्रात राहणारा कन्हैयालाल शिर्के गेल्या एक वर्षापासून वडोदरा येथील वासना गावातील स्मशानभूमीत राहत आहे आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. कन्हैयालाल महाराष्ट्रातून वडोदरा येथे आला होता. त्याची पत्नी मुंबईत छोटंमोठं काम करत होती.

कन्हैयालाल येथे येऊन पेंटींगचं काम करत होता. पण एक वर्षाआधी लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. काही दिवस कसेतरी काढल्यानंतर त्याने मजुरीही केली. पण त्यातून काही भागत नव्हतं. यादरम्यान त्याची पत्नी आणि मुलीही वडोदऱ्याला आले. आता त्याच्यावरील जबाबदारी आणखीन वाढली होती. त्याच्याकडे ना नोकरी होती ना रहायला ठिकाणा.

त्यानंतर शिर्के परिवाराला घेऊन वासना गावातील स्मशानभूमीत राहू लागला होता. इथे राहत असताना तो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू लागला. या कामात कन्हैयालाल याला पत्नीही साथ देत होती. सकाळी दोघेही या कामाला लागतात. अनेकदा तर त्यांची मुलंही त्यांना मदत करतात.

कन्हैयालालने सांगितले की, सुरूवातीला अनेक अडचणी आल्या आणि अनेक समस्या होत्या. पण जेव्हा काहीच सापडलं नाही तेव्हा अंतिम धाम सापडलं. कन्हैयालालची पत्नी म्हणाली की, तिच्यासाठी पतीच सगळं काही आहेत. त्यांची साथच महत्वाची आहे. पती जिथे ठेवेल तिथे आनंदाने राहील. पती-पत्नी दोघेही आता आनंदी आहेत. मुलांचा सांभाळ करत आहे. 
 

Web Title: Graveyard working home family jobless man funeral dead bodies Vadodara Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.