म्हणून 'या' कंपनीत स्टाफ कमवतो ५० लाख, पण मालकंच घेतो कमी पगार....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:03 PM2020-03-27T12:03:29+5:302020-03-27T13:16:49+5:30

कंपनीचा मालक पाच वर्ष झाले तरी स्वतः कमी पगार  घेतो. 

Gravity payments founder dan price who cut his salary to give employees 50 lakh myb | म्हणून 'या' कंपनीत स्टाफ कमवतो ५० लाख, पण मालकंच घेतो कमी पगार....

म्हणून 'या' कंपनीत स्टाफ कमवतो ५० लाख, पण मालकंच घेतो कमी पगार....

googlenewsNext

अमेरिकेतील सिएटलमधील एका कार्ड पेमेंट्सच्या कंपनीच्या बॉसने आपल्या कंपनीच्या स्टाफला ७० हजार डॉलरर्स म्हणजेच ५० लाख रुपयांचे कमीतकमी वेतन देण्याचे जाहीर केले. ही गोष्ट २०१५ मधील आहे. पण या कंपनीचा मालक पाच वर्ष झाले तरी स्वतः कमी पगार  घेतो. 

(Image Credit : Facebook/GrantTree)

प्राईस डॅन आपली मैत्रीण वॅलरी हिच्यासोबत  सिएटलच्या पर्वतांवर सफर करत होते.  तेव्हा त्यांना एक गोष्ट कळली. त्यामुळे ते हैराण झाले. चालता चालता वॅलरीने सांगितले की  तीचं जीवन खूपच त्रासदायक झालं आहे. तीच्या घरमालकाने घरभाडे २०० डॉलर वाढवले आहे. म्हणून तिला खर्चायला पैसे कमी पडतात आणि  दोन ठिकाणी काम करावं लागतं. त्यामुळे प्राईड हैराण झाले. 

Best boss ever this CEO announces Rs 710622 raise for all his employees | बाबो!
 प्राईस यांना जगातील आर्थीक विषमता मंजूर नव्हती. नंतर त्यांना जाणवलं की  ते स्वतःसुद्धा या समस्येचा हिस्सा आहेत.  वयाच्या ३१ व्या वर्षी प्राईस करोडपती बनले होतो. त्यांच्या कंपनीत २००० पेक्षा जास्त ग्राहक असल्यामुळे चांगला नफा मिळत होता.  प्राईस हे एका वर्षाला १.१ मिलियन म्हणजेच आठ करोड रुपये कमवत होते. पण त्यांची मैत्रीण वॅलरी हिच्यामुळे त्यांना जाणवलं की कंपनीत काम करणारा कर्मचारीवर्ग सुद्धा याच समस्येतून जात असेल. म्हणून त्यांनी ही स्थिती बदलण्याचा विचार केला. 

त्यांच्या मनात एक विचार आला की  अमेरिकेतील माणसाला खूश ठेवण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणून प्राईसने वॅलरीला प्रॉमिस केलं. की त्यांच्या कंपनीत कमी पैशात काम करत असलेल्या लोकांचा पगार वाढवण्यात येईल. तेव्हा लगेचच प्राईसने आपल्या कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची मिटिंग घेतली आणि त्यांना  ही गोष्ट सांगितली. प्राईड यांना वाटलं की लोक हे ऐकून  खूप आनंदी होतील. पण असं  झालं नाही वातावरण खूपच शांत झालं होतं. 

त्यांचं असं म्हणणं आहे की कमीतकमी ७० हजार डॉलर दिल्यामुळे कंपनीतील टिमच्या २ ते ३ लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.  पण मागच्या अनेक वर्षात लोकसंख्या वाढत असल्यामुळे वेतन वाढणं सुद्धा गरजेचं आहे. कंपनीचे १० टक्के कर्मचारी असे आहेत. ज्यांनी अमेरिकेच्या शहरात आपले घर घेतले आहे. या आधी हा आकडा १ टक्के होता. 


प्राईसनां  लोक असं म्हणतात की जे अतिरिक्त पैसै मिळणार आहेत.  कर्मचारी ते पैसे अनावश्यक गोष्टींसाठी खर्च करतील. पण असं काहीही झालं नाही. सगळे कर्मचारी स्वेच्छेने आपले पैसे पेंशन फंडमध्ये जमा करत होते. ७० टक्के लोकांनी कर्जाची रक्कम पूर्णपणे भरली  होती. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जाते की,  याआधी २०१५ मध्ये डॅन प्राइसने स्वत:च्या पगारात ८० ते ९० टक्के कपात केली होती. तेव्हा त्यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ७० हजार डॉलर पगाराची घोषणा केली होती. त्यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, 'मी समस्यांचा भागीदार होऊन शकलो आहे, मला समाधानाचा भागीदार व्हायचं आहे. आधी मी दर वर्षी एक मिलियन डॉलरची कमाई करत होतो, तर माझे कर्मचारी केवळ ३० हजार डॉलरचीच कमाई करत होते'.

Web Title: Gravity payments founder dan price who cut his salary to give employees 50 lakh myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.