फ्रीमध्ये रहा...खा आणि पैसेही कमवा! या सुंदर बेटाकडून खास ऑफर, पण असेल एक अट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:53 AM2024-01-19T10:53:47+5:302024-01-19T10:54:07+5:30

आयरलॅंडमधील सगळ्यात नयनरम्य ग्रेट ब्लास्केट बेटाकडून ही ऑफर देण्यात आली आहे. पण कुणा एकट्यासाठी नाही तर एका कपलसाठी आहे. 

Great Blasket island inviting people with accommodation and food with small condition | फ्रीमध्ये रहा...खा आणि पैसेही कमवा! या सुंदर बेटाकडून खास ऑफर, पण असेल एक अट...

फ्रीमध्ये रहा...खा आणि पैसेही कमवा! या सुंदर बेटाकडून खास ऑफर, पण असेल एक अट...

सगळ्यांनाच सुंदर सुंदर ठिकाणांवर फिरायला जायला आवडतं. अनेक ठिकाणं तर अशी असतात जे बघून वाटतं तिथेच नेहमीसाठी रहावं. पण यासाठी येणारा खर्च बघून लोकांची ही ईच्छा अपूर्णच राहते. मात्र, सध्या एक खास ऑफर चर्चेचा विषय ठरत आहे. आयरलॅंडमधील सगळ्यात नयनरम्य ग्रेट ब्लास्केट बेटाकडून ही ऑफर देण्यात आली आहे. पण कुणा एकट्यासाठी नाही तर एका कपलसाठी आहे. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आयरलॅंडच्या ग्रेट ब्लास्केट आयलॅंडही संधी मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे इतक्या सुंदर बेटावर रहायला मिळणार, सोबत पैसेही मिळणार. इथे पर्यटकांची कमी अजिबात नाही. पण मग असं असूनही ही ऑफर का दिली जात आहे? चला जाणून घेऊ उत्तर...

ऑफर केली जात आहे खास नोकरी

इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात, अशात इथे कपल्सना नोकरीसाठी बोलवलं जात आहे. जे पर्यटकांची सेवा करू शकतील. त्यांना चहा-कॉफी देऊ शकतील आणि त्यांच्या गरजांची काळजी घेतील. या कामासाठी कपल्सना पैसेही दिले जातील. इतकंच नाही तर दुकानातच वरच्या मजल्यावर राहण्याची व्यवस्थाही असेल. 

एप्रिल ते ऑक्टोबर 2024 पर्यंत हे काम असेल. कारण इथे याच काळात सगळ्यात जास्त पर्यटक येतात. आयलॅंडच्या वेबसाइटवर लिहिलंय की, हॉस्पिटॅलिटीमध्ये अनुभव असणाऱ्या कपल्सना प्राधान्य मिळेल आणि त्यांना इंग्रजीमध्ये बोलताही आलं पाहिजे. पण एक अट अशी आहे की, ही नोकरी करताना तुम्हाला एकही सुट्टी मिळणार नाही. अर्ज करणाऱ्यांचं वय 40 पेक्षा कमी असलं पाहिजे.
 

Web Title: Great Blasket island inviting people with accommodation and food with small condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.