अमेरिकेतील 'या' शहरात ना मोबाइल, ना इंटरनेट ना टीव्ही, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:26 PM2018-08-27T15:26:36+5:302018-08-27T15:28:52+5:30

अमेरिकेसारख्या विकसीत देशात याशिवाय पर्याय नाहीये. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, अमेरिकेत असं शहर आहे जिथे मोबाइल, वायफाय आणि रेडिओ हे काहीही नाही. 

Green bank the american town with no mobile phones, wi-fi or radio | अमेरिकेतील 'या' शहरात ना मोबाइल, ना इंटरनेट ना टीव्ही, जाणून घ्या कारण!

अमेरिकेतील 'या' शहरात ना मोबाइल, ना इंटरनेट ना टीव्ही, जाणून घ्या कारण!

Next

आजच्या जगात जर माणसं कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त वैतागले असतील तर ती गोष्ट म्हणजे मोबाइल फोन आणि इंटरनेट आहे. पण या गोष्टी आताच्या जगात फार गरजेच्या झाल्या आहेत. मोबाइल आणि इंटरनेटशिवाय राहणे कठीण होऊन बसले आहे. अमेरिकेसारख्या विकसीत देशात याशिवाय पर्याय नाहीये. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, अमेरिकेत असं शहर आहे जिथे मोबाइल, वायफाय आणि रेडिओ हे काहीही नाही. 

कुठे आहे हे शहर?

अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्ये पोकाहोंटस काऊंटी येथील ग्रीन बॅंक हे ते शहर आहे. राहण्यासाठी जगातला सर्वात शांत परिसर या ठिकाणीला म्हटलं जातं. या शहरात कुणीही मोबाइल, वायफाय आणि टेलिव्हिजन वापरत नाहीत. म्हणजे पूर्वीप्रमाणे हे शहर आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर आहे. 

जगातला सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप

ग्रीन बॅक या शहरात जगातला सर्वात मोठा स्टीरबल रेडिओ टेलिस्कोप रॉबर्ट सी. बार्ड ग्रीन बॅंक टेलिस्कोप लावला आहे. त्यामुळेच या शहरात अशा सर्व उपकरणांवर बंदी आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेब निर्माण करतात. रेडिओ टेलिस्कोप गॅलक्सीमधून येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेब्सची ओळख पटवतात. त्यामुळे याच्या आजूबाजूला कोणतेही वेव्ह्स निर्माण झाले तर हे योग्यप्रकारे रि़डींग करु शकत नाही. 

पेट्रोल गाड्यांवरही बंदी

इथे केवळ मोबाइल, वायफाय, रेडिओ किंवा टीव्हीवरच नाही तर पेट्रोल गाड्यांवरही बंदी आहे. कारण गॅसोलिन इंजिनमध्ये स्पार्कचा वापर होतो आणि यानेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी तयार होता. 

केवळ ग्रीन बॅंकच नाही तर आजूबाजूच्या १३ हजार स्क्वेअर फूटपर्यंत पसरलेल्या परिसरात डिव्हाइस फ्रि झोन घोषित केलं आहे. या परिसराला नॅशनल रेडिओ क्वाइट झोन म्हटलं जातं. हे ठिकाण व्हर्जिनिया आणि मेरीलॅंडच्या सीमेवर आहे. 

संपर्कासाठी पे-फोन बूथ्स

ग्रीन बॅंकमध्ये सध्या साधारण १५० लोक राहतात. ते आपल्या जीवनाला आजच्या जगात वरदान मानतात. इथे मुलं मोबाइल फोन आणि टीव्हीला चिकटून राहण्याऐवजी आपापसात बोलतात आणि खेळणं पसंत करतात. जर दुसऱ्या शहरातील नातवाईकांशी बोलायचं असेल तर ते पे फोन बूथ्सचा वापर करतात. 

ना हॉटेल, ना रुग्णालय

महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या शहरांमधून लोक इथे रहायला येत आहेत. २००७ मध्ये पतीसोबत इथे रहायला आलेली डियान शू ने सांगितले की, 'तुम्ही म्हणू शकता की, जीवन इथे परफेक्ट नाहीये. इथे ना किराण्याचं दुकान आहे ना हॉटेल. जवळपास रुग्णालय सुद्धा नाही. पण मी इथे निरोगी आहे. इथे माझ्या डोक्यात दुखत नाही'.
 

Web Title: Green bank the american town with no mobile phones, wi-fi or radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.