मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:35 AM2019-03-19T11:35:18+5:302019-03-19T11:40:44+5:30

मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याने चर्चेत होती.

Greta Thunberg nominated Nobel peace prize | मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

Next

(Image Credit : st.ilfattoquotidiano.it)

काही वर्षांपूर्वी मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याने चर्चेत होती. आता पुन्हा एक १६ वर्षीय स्वीडिश मुलगी या पुरस्काराच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. ग्रेटा थुनबर्ग असं या मुलीचं नाव असून तिला शांततेच्या नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. 

रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी ग्रेटाने जलवायु परिवर्तन(ग्लोबल वार्मिंग) रोखण्यासाठी 'स्कूल स्ट्राइक' करून स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलनाला बसली होती. या कामात ग्रेटाला इतर विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचीही मदत मिळाली होती. या सर्वांनी मिळून जोरदारपणे या अभियानाचं समर्थन केलं होतो.  

(Source: cnn)

इतकेच नाही तर हे अभियान यशस्वी करण्यासाठी १६ वर्षीय या मुलीने शाळेत जाणेही बंद केले होते. शेवटी ग्रेटाची मेहनत सफल झाली. त्यानंतर हे अभियान केवळ यूरोपच नाही तर जगभरात चर्चेचा विषय ठरलं. 

तसेच ग्रेटाने डिसेंबर २०१८ मध्ये पोलंडमध्ये झालेल्या UN क्लायमॅट चेंज कॉन्फरन्समध्ये ग्लोबल वार्मिंगबाबत जबरदस्त भाषण दिलं होतं. त्यानंतर ती जगासमोर एक स्टार म्हणून समोर आली. ग्रेटाचं वय पाहता भलेही तिला जगाची पूर्ण समज नसावी, पण ग्लोबल वार्मिंगबाबतचे तिचे विचार इतरांपेक्षा फार वेगळे आणि मोठे आहेत.

(Source: bcdn)

नोबेलसाठी नामांकन मिळालेल्या ग्रेटाचं म्हणणं आहे की, आपण सर्वांनीच जमिनीखालील तेल आणि खनिजांना सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. तसेच जगात आपल्याला समानता आणण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जर आपण सिस्टमच्या आत राहून समाधान शोधू शकत नाही तर आपण पूर्ण सिस्टीम बदलायला हवी. ग्रेटाने फार कमी वयात आपल्या भाषणातून जगातल्या मोठमोठ्या लोकांना हैराण केलं होतं. इतकेच नाही तर ग्लोबल वार्मिंगबाबत ग्रेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

 

Web Title: Greta Thunberg nominated Nobel peace prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.