नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता नवरदेव, पण परवानगीच मिळाली नाही आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:40 AM2023-11-30T11:40:14+5:302023-11-30T11:40:41+5:30
Bihar : नंतर नवरदेव आणि नवरीला गया एअरपोर्ट मार्गे जमशेदपूरसाठी रवाना करण्यात आलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील आहे.
Bihar : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एक नवरदेव आपल्या नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता. पण जिल्हा प्रशासनाने लॅंडिंगची परवानगीच दिली नाही. यानंतर मुलाकडील लोकांनी गावाच्या वरूनच हेलिकॉप्टरने सप्तपदी पूर्ण केली. म्हणजे हेलिकॉप्टरने वरूनच गावाला सात फेरे मारले. नंतर नवरदेव आणि नवरीला गया एअरपोर्ट मार्गे जमशेदपूरसाठी रवाना करण्यात आलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील आहे.
मोहद्दीपूर गावात राहणारे रामानंद दास यांची मनापासून ईच्छा होती की, आपल्या डॉक्टर मुलीचं पाठवणी हेलिकॉप्टरमधून करावी. नवरीची आई राजकुमारी या सुद्धा नुकत्याच रेल्वे हॉस्पिटलमधून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचीही ईच्छा होती की, मुलीच्या लग्नानंतर गावातूनच तिची पाठवणी हेलिकॉप्टरने करावी. पण प्रशासनाने परवानगी न दिल्याने नवरी-नवरदेवाला गया एअरपोर्टहून उड्डाण घ्यावं लागलं. प्रशासनाच्या या वागणुकीमुळे नवरीकडील लोक नाराज आहेत.
9 लाख रूपयात हेलिकॉप्टर केलं होतं बुक
रामानंद दास यांनी त्यांची मुलगी मेघा राणीचं लग्न 27 नोव्हेंबरला जमशेदपूरच्या डॉ.विवेक कुमार याच्यासोबत बोधगयातील एका हॉटेलमध्ये केलं होतं. 28 नोव्हेंबरला आपलं मूळ गाव मोहद्दीपूरमधून हेलिकॉप्टरने तिची पाठवणी करण्याची सगळी व्यवस्था केली होती. नवरीचा भाऊ मृत्युंजय कुमारने पटणाहून 9 लाख रूपयांमधये हेलिकॉप्टर बुक केलं होतं.
नवरीकडील लोकांनी हेलिकॉप्टर लॅंडिंगसाठी गावातीलच शेतात हेलीपॅड तयार केलं होतं. पण सिक्युरिटीचं कारण देत जिल्हा प्रशासनाने लॅंडिंगची परवानगी दिली नाही. ज्यामुळे हेलिकॉप्टर गावाच्या वर काही वेळ फिरलं, सात फेरे घेतले आणि मग गयावरून जमशेदपूरहून रहावा झालं.
नवरीचे वडील रामानंद दास म्हणाले की, 'माझी मुलगी घरी शिकूनच डॉक्टर बनली होती. त्यावेळीच आम्ही ठरवलं होतं की, जो बाहेर शिकण्याचा खर्च वाचला, त्यातूनच हेलिकॉप्टरमध्ये बसवून तिची पाठवणी करू. पण प्रशासनाने परवानगी दिली नाही'.