लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने केलं असं काम, परिवारासोबत धरण्यावर बसली नवरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:48 AM2023-03-23T10:48:12+5:302023-03-23T10:48:24+5:30

लग्नाच्या पहिल्या म्हणजे मधुचंद्राच्या रात्री तिचा पतीच्या तिच्यासोबत असं काही करेल ज्याचा तिने विचारही केला नव्हता.

Groom did wrong thing in honeymoon bride sat on a dharna in Patna | लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने केलं असं काम, परिवारासोबत धरण्यावर बसली नवरी

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने केलं असं काम, परिवारासोबत धरण्यावर बसली नवरी

googlenewsNext

सगळ्याच तरूण-तरूणींसाठी लग्न हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. तरूणी सुद्धा आपल्या सुखी संसाराचं स्वप्न पाहत पतीचं प्रेम मिळवण्यासाठी माहेर सोडून सासरी येते. बिहारमध्येही एक नवरी हेच स्वप्न घेऊन आपल्या सासरी आली. पण तिला याचा जराही अंदाज नव्हता की, लग्नाच्या पहिल्या म्हणजे मधुचंद्राच्या रात्री तिचा पतीच्या तिच्यासोबत असं काही करेल ज्याचा तिने विचारही केला नव्हता. नवरदेवाने लग्नाच्या पहिल्या रात्री असा काही कारनामा केला की, नवरी आपल्या परिवारासोबत धरण्यावर बसली.

हा पूर्ण वाद गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. 2019 मध्ये पटणाच्या राजीव नगरमध्ये राहणाऱ्या रोहितचं लग्न धडक्यात स्मितासोबत झालं होतं. पण दोघांमध्ये काही कारणाने वाद झाला आणि दोघेही वेगवेगळे राहू लागले.

असं सांगण्यात आलं की, सुहागरातच्या दिवशी नवरी आणि नवरदेवामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. ज्यानंतर नवरीने कथितपणे नवरदेवाला चपलेने मारलं होतं. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. यादरम्यान दोन्ही परिवारात वाद पेटला आणि सासरकडूनही नवरीला घेण्यासाठी कुणी आलं नाही. अचानक एक दिवस नवरी आपल्या परिवारासोबत सासरी आली आणि धरण्यावर बसून गोंधळ घालू लागली. 

दरम्यान, याआधीही लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी-नवरदेवाच्या वादाच्या आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या. काही केसेसमध्ये नवरदेवाने नवरीला मारहाण केली तर काही केसेसमध्ये लुटरी दुल्हनच्या घटना घडल्या. सध्या लग्नाचा सीझन आहे त्यामुळे अशा घटना नेहमीच समोर येत असतात.

Web Title: Groom did wrong thing in honeymoon bride sat on a dharna in Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.