लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम'; 'हा' फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'कंपनीवाले लग्नाला तर सुट्टी द्या'...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:17 PM2022-11-26T16:17:13+5:302022-11-26T16:26:17+5:30
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नातील अनेक वेगळे किस्से व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नातील अनेक वेगळे किस्से व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे, या फोटोत एक वर स्वत:च्या लग्नातच 'वर्क फ्रॉम होम' काम करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये एक वर त्याच्या लग्नाच्या दिवशी लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोत एक मुलगा लग्नात बसलेला दिसत आहे, त्याच्या लग्नाचे विधी सुरू असल्याचे फोटोत दिसत आहे. तो लॅपटॉप उघडून बसलेला दिसत आहे.
गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली...; रिक्षा चालकाशी लग्न करायला 'फॉरेनची मुलगी' भारतात आली
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना श्रीमोयी नावाच्या युजरने लिहिले की, हा त्यांचा भाऊ आहे आणि त्याचे लग्न आहे. मात्र या काळात मुलगा लग्नाचे विधी तसेच लॅपटॉपवर काम करत आहे. यानंतर हा फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्सने तो शेअर केला.
हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. या फोटोवर एका यूजरने लिहिले की, भाऊ आपण कोणत्या जगात राहत आहोत की लग्नाच्या दिवशीही सुट्टी मिळत नाही.